शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यावेतनसाठी आटीआयमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सात ते आठ महिन्यापासून विद्यावेतन न मिळालेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत. याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सात ते आठ महिन्यापासून विद्यावेतन न मिळालेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विविध अडचणी येत आहेत. याची दखल घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयटीआयमध्ये एक तास ठिय्या दिला. त्यानंतर लवकरच विद्यावेतन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्राचार्यानी दिले.नंदुरबार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या सात, आठ महिन्यांपासून अडकलेले विद्यावेतन विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या. अनेक दिवसांपासून अडकलेले विद्यावेतन विद्यार्थ्यांना लवकर मिळावे यासाठी आज अभाविप नंदुरबार शाखेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे ठिय्या दिला.यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे विद्यावेतन त्यांच्या खात्यात जमा करावे व भविष्यात विद्यार्थ्यांना अशा अडचणी येऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी अभाविप नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी केली.तासभर चाललेल्या या मागणीच्या आंदोलनाची प्रभारी प्राचार्य आर.पी.पाटील यांना दखल घ्यावी लागली. अभावीपच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या चार ते पाच दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात विद्यावेतन जमा केले जाईल असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा संयोजक निलेश हिरे, शहर वस्तीगृह प्रमुख किशोर कोळेकर, आशिष नाईक, उमेश जगताप, निलेश सूर्यवंशी आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.