प्रकाशा ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:22+5:302021-04-11T04:29:22+5:30

गावात गेल्या आठवड्यात कोरोनासह इतर कारणांनी मृत्युसंख्या वाढल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रा.पं.कडून उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामविकास ...

Various measures taken by Prakasha Gram Panchayat | प्रकाशा ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना

प्रकाशा ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना

गावात गेल्या आठवड्यात कोरोनासह इतर कारणांनी मृत्युसंख्या वाढल्याने भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रा.पं.कडून उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामविकास अधिकारी बी.जे. पाटील, तलाठी धर्मराज चौधरी, ग्रा.पं. सदस्य दिलीप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वतः गावात फिरून फवारणी करून घेतली. गावातील सर्वच भागात फवारणी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी दिली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेला लाॅकडाऊनही कडक पाळण्यात येत असून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांकडूनही समज देण्यात येत आहे. गावातील शाळा-महाविद्यालयही बंद करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरण

प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. हे लसीकरण सोमवार ते शनिवारपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.विवेक बाविस्कर यांनी दिली.

Web Title: Various measures taken by Prakasha Gram Panchayat