शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज उन्नती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तिमाही सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्नती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गुरव होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,समस्त दाहीगाव गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, नंदुरबार गुरव समाज अध्यक्ष प्रविण गुरव माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, भीमराव गुरव, नगरसेविका भावना गुरव, मनीषा गुरव, शशिकांत बेगराज, मधुकर गुरव, अशोक गुरव, रवींद्र गुरव, पुंडलिक गुरव, विश्वनाथ गुरव, ह.भ.प.नरेंद्र गुरव, ह.भ.प. वासुदेव महाराज, संजय गुरव, गोरख गुरव, सुरेश गुरव, मोतीलाल गुरव , बद्रीनाथ गुरव , निंबा गुरव, वामन गुरव, अशोक गुरव, नितीन गुरव, दीनानाथ गुरव, छोटू गुरव, नानाभाऊ गुरव, प्रकाश गुरव, राजेंद्र सोनवणे, प्रमोद गुरव, रामदास गुरव, प्रतिमा गुरव, सोनाली गुरव, पुरुषोत्तम गुरव, अरुण गुरव, आदी व्यासपीठावर होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत काशिबा महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव नाना गुरव यांनी केले. या वेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी समाजात काम करताना तन-मन-धनाने करावे आपसातील वैर विसरून समाज एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. शासनाचा योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून द्यावा, गुरव समाज बेल फुल देऊन आपले उदरनिर्वाह करतो गुरव समाजाची शहनाई हे मंगल वाद्य गुरव समाजाचे प्रतीक आहे. मंगल वाद्य ही परंपरा त्यांनी जोपासावी असेही सांगितले.त्यानंतर गुरव समाजाच्या पुढील तीन वषार्साठी अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून सुरेश केशव गुरव यांची निवड करण्यात आली. निवडणूक न करता सुरत, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, येथील समाज अध्यक्षांनी तळोदा येथील सुरेश केशव गुरव यांना पाठिंबा दिल्यामुळे सवार्नुमते त्यांना अध्यक्ष करण्यात आले. निवड झाल्यानंतर त्यांनी सांगितले की संस्थेचा अध्यक्ष पदाला मी न्याय देईन, समाजातील घटकांसाठी विविध योजना आणण्याचा मी प्रयत्न करीन, पर राज्यातील समाजातील रोटी-बेटी व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले याप्रसंगी दाहीगाव अध्यक्ष नरेंद्र गुरव यांनी निवडणूक न करता सर्वांच्या संमतीने तीन राज्यातुन अध्यक्षाची निवड झाली. म्हणजे आपली एकता आहे. समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण करून समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नंदुरबार येथील संत काशिबा महाराज गुरव चौकात मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रविण गुरव यांचा वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी समाजाला शितशव पेटी दान केली आहे. जी समाजातील घटकांना वापरण्यासाठी मोफत मिळणार आहे.कार्यक्रमासाठी प्रविण गुरव, सुधीर गुरव, हेमंत गुरव, रघुनाथ गुरव, किरण गुरव, विजय शिरसाट, शशिकांत गुरव, वैभव गुरव, गणेश गुरव, सुधाकर गुरव, भूपेंद्र गुरव, गणेश गुरव, नानाभाऊ गुरव, हरिश्चंद्र गुरव, नगिन गुरव, पुरुषोत्तम गुरव, आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन वाय.आर. गुरव, आभार सचिव शशिकांत गुरव यांनी मानले.