मासिक पाळीतही घेता येते लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:06+5:302021-05-08T04:32:06+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण १ लाख ५९ हजार ३०५ जणांना कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत. वेगाने सुरू ...

The vaccine can also be taken during menstruation | मासिक पाळीतही घेता येते लस

मासिक पाळीतही घेता येते लस

googlenewsNext

नंदुरबार : जिल्ह्यात एकूण १ लाख ५९ हजार ३०५ जणांना कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत. वेगाने सुरू असलेल्या लसीकरणाबाबत अनेक समज-गैरसमज होत आहेत. यात महिलांनी मासिक पाळीत लसीकरण करू नये, असा गंभीर विषय समोर आला आहे. परंतु, हा प्रचार खोटा असून, केवळ गर्भवती व स्तनदा माता यांनाच लसीकरणास मनाई असून, बाकीच्यांनी लस घेण्यास काहीही हरकत नसल्याचा निर्वाळा जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ डाॅक्टर्स व स्त्रीरोग तज्ज्ञ देत आहेत.

जिल्ह्यात जानेवारी मध्यापासून लसीलकरणाला प्रारंभ झाला होता. यातून आतापर्यंत १३ हजार ३९३ हजार आरोग्य कर्मचारी, १८ हजार ८०८ फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ ते ६० वयोगटांतील ८७ हजार ४९, तर १८ ते ४५ वयोगटांतील ५ हजार ३४४ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातून जिल्ह्याचे लसीकरण हे दोन टक्के झाले आहे. यात महिलांचा सहभाग मोठा असून, आरोग्य विभागातील आरोग्यसेविका, आशा, अंगणवाडी सेविका, जिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, सुरक्षित असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

गर्भवती व स्तनदा मातांना दिलाय थांबा

आरोग्य यंत्रणेने लस घेणाऱ्या १८ ते ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना लस घेण्यास परवानगी दिली आहे. परंतु, यातून गर्भवती माता व स्तनदा मातांना वगळण्यात आले आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे रक्तदाब, सिकलसेल, शुगर यासह इतर व्याधी असलेल्या ज्येष्ठ महिलांचेही लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. या महिलांना त्या-त्या केंद्रांवरील महिला वैद्यकीय अधिकारी व परिचारिका ह्या माहिती देऊन मार्गदर्शन करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून लसीकरण वाढीसाठी केल्या जाणाऱ्या जनजागृतीत महिलांना विशेष मार्गदर्शन केले जात आहे. दुर्धर आजार असलेल्या महिलांही लस घेऊ शकत असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या परिचारिका व आरोग्य कर्मचारी सुखरूप असल्याने सामान्य महिलांनीही विनासायस लस घेण्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. के. डी. सातपुते यांना संपर्क केला असता, मासिक पाळीत लस घेता येते. गैरसमज पसरविणारे मेसेजपासूनच नागरिकांनी दूर राहिले पाहिजे. लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व परिचारिकांचे लसीकरण झाले आहे. त्या सुरक्षित आहेत.

स्त्री रोग तज्ज्ञ डाॅ. सुलोचना बागुल यांना संपर्क केला असता, कोविड प्रतिबंधक लस महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. मासिक पाळीत लस न घेणे किंवा इतर कारणे पसरवून महिलांमध्ये भीती पसरविणे थांबले पाहिजे. नागरिकांनी याकडे गांभीर्याने कोविड लसीकरण करून घ्यावे, ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे.

Web Title: The vaccine can also be taken during menstruation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.