शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

लसीकरणामुळे तिसरी लाट रोखता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ...

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत असून, नवीन रुग्णांची संख्याही नियंत्रणात आली आहे. यातून प्रशासनाने लसीकरणावर भर दिला असून, जिल्ह्यात लसीकरणातून तिसरी लाट रोखण्याचा निर्धार केला जात आहे.

फेब्रुवारी अखेरीसपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होऊन मार्च आणि एप्रिल महिन्यात बाधित आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली होती. यातून जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक हानी करणारी ठरली आहे. यावर सातत्याने कार्य करत प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत निर्माण केलेल्या सुविधांमुळे जिल्ह्याची ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसह ऑक्सिजनची क्षमता वाढली आहे. यातून अनेकांना उपचार मिळू शकल्याने ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने, जिल्ह्याचा कोरोनामुक्तीचा दर हा ८१ टक्के झाला आहे. तर दुसरीकडे २५ टक्क्यांच्या पुढे गेलेला पाॅझिटिव्हिटी रेट हा १६ टक्क्यांवर आला आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने, जिल्ह्यात येत्या काळात कोरोना नियंत्रणात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, येत्या काळात कोरोनाची तिसरी लाट आल्यास लसीकरण हाच त्यावर योग्य तो पर्याय असल्याने लसीकरण वाढीकडे लक्ष दिले जात आहे. दरदिवशी ३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे.

ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर, त्याच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकृत केले जात आहे. यासाठी गावोगावी जिल्हा परिषद शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. या ठिकाणी लक्षणे नसलेल्या, तसेच जोखमीच्या संपर्कात आलेल्यांना ठेवले जात आहे.

यातून काॅन्टॅक्ट ट्रेसिंगही पूर्ण होत आहे. जिल्ह्यात ६० प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० पेक्षा अधिक उपकेंद्रांतर्गत समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, सेवक, आशा आणि अंगणवाडीसेविका यांची पथके तैनात आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्या मदतीने रुग्णांची माहिती त्यांच्याकडून दिली जात आहे.

एकीकडे ग्रामीण भागापर्यंत उपचार पोहोचत असताना, दुसरीकडे ग्रामस्थांना लक्षणे दिसल्यास चाचण्या करण्यासाठी सातत्याने आवाहन केले जात आहे. यासाठी त्या गावातील जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळांचे शिक्षक नियुक्त करण्यात येत आहेत. यातील काही शिक्षक कोरोनाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी भेटी देत आहेत. यातूनही मोठा फरक पडून चाचण्या वाढून, बाधित उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते.

लसीकरण @ २.६२

२० लाख लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाने ४५ लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसह आरोग्य केंद्र व खासगी ठिकाणी ही केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमधून आतापर्यंत १ लाख ७५ हजार नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. आरोग्य, फ्रंटलाइन कर्मचारी, तसेच ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना ही लस दिली जात आहे. १८ वर्षांवरील वयोगटांत पहिला डोस घेण्यासाठी उत्सुकता असल्याचे त्या-त्या केंद्रातील गर्दीवरून दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.आर.डी.भोये, डाॅ.के.डी.सातपुते यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. दैनंदिन सूचना आणि बैठका यातून कामाला दिशा मिळाली आहे. येत्या काळात रुग्णवाढीचा धोका निर्माण झाल्यास सुविधा उपलब्ध आहेत. तूर्तास मात्र लसीकरण हा कोरोना रोखण्याला पर्याय आहे.

-डाॅ.एन.डी.बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार तालुक्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा ४३ टक्के आहे. रुग्ण आढळून येण्याची संख्या तालुक्यात अधिक असल्याने पाॅझिटिव्हिटी रेट कायम चढता राहिला होता.

त्या खालोखाल ३१ टक्के पाॅझिटिव्हिटी रेट हा शहादा तालुक्याचा आहे. तालुक्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सर्वाधिक होते. त्या खालोखाल नवापूर, तळोदा हे तालुके असून, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा कमी आहे.