वाघाळेत १२९ जणांना लसीची पहिली मात्रा
ग्रामपंचायत वाघाळे येथे लसीकरणासाठी ५०५ व्यक्तींची नोंदणी करण्यात आाली आहे. यापैकी १२९ व्यक्तींना आज आयोजित शिबिरात लसीची पहिली मात्रा देण्यात आली. शिबिराच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने एकत्रित प्रयत्न केले. शिक्षकांनी नोंदणीसाठी सहकार्य केले. शिबिराला सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, पोलीस पाटील, विस्तार अधिकारी , ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
बलवंड येथे ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण
ग्रामपंचायत बलवंड तर्फे आयोजित लसीकरण शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबिरात १८० जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी पटाईत यांनी ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आणि कोरोना विषयक नियम पाळण्याचे आवाहन केले. गावात ३७० व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे.