या वेळी केंद्रप्रमुख पंडित एंडाईत, ग्रामसेवक प्रभुदास गावीत, तलाठी मोतीराम गावीत, डोगेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सचिन वळवी, डॉ.राकेश वळवी, मुख्याध्यापक उदेसिंग गावीत उपस्थित होते.
शिबिराला खासदार डॉ.हीना गावीत, पं.स.चे सभापती रतिलाल कोकणी, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यासाठी संपूर्ण गावात घरोघरी जनजागृती करण्यासाठी आरोग्य सहायक दिलीप बोधले, प्रल्हाद वानखेडे, मुख्याध्यापक उदेसिंग गावीत, शिक्षक सुनील अहिरे, मीरा कोकणी, नीलम पाडवी, अंगणवाडी सेविका निर्मला गावीत, वंदना वळवी, कविता वळवी, आशा कार्यकर्ती सुनीता पाडवी, विमल वळवी, परिचारिका निर्मला मावची, योगीता वळवी, भावना वळवी, सुनंदा गावीत, भूपेंद्र वळवी, मदतनीस मालिनी वळवी, उज्वला वसावे, सुलभा गावीत, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल गावित यांनी परिश्रम घेतले. लवकरच या गावाचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे सरपंच किसन वळवी यांनी सांगितले.