अक्कलकुवा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामीण भागात विविध अफवांमुळे विरोध होत होता. मात्र शिक्षक, ग्रामस्थ, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाने आता लसीकरणाने वेग घेतला आहे. एकाच गावात सपाटीच्या भागात प्रथमच ३४० लोकांनी लसीकरण करुन घेतल्याने प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. या वेळी पं.स. सदस्य किशोर पाडवी, सरपंच जितेंद्र वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील मालखेडे, झोनल अधिकारी नीलेश गढरी, विस्तार अधिकारी बी. डी. मोहिते, डॉ. अजित कोठारी, ग्रामविकास अधिकारी विनोद ढोढरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमिता पाडवी, पोलीस पाटील अरविंद वसावे, मुख्याध्यापक नरपत पाडवी, अंगणवाडी सेविका, आशा कायर्कर्ती, अन्वर वसावे, करमसिंग पाडवी, हेमराज वसावे, किरण वसावे, अजबसिंग वसावे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिबिरासाठी प्रयत्न केले.
ब्राह्मणगावला ३४० जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST