यावेळी भांगा रामा वसावे, डाॅ. अजित कोठारी, मुख्याध्यापक सुनील मावची, विजा वेस्ता वसावे, रणधीर भामरे, पोलीस पाटील नानसिंग वसावे, वेस्ता गोवल्या वसावे उपस्थित होते.
प्रारंभी डाॅ. अजित कोठारी यांनी लाभार्थींना स्थानिक बोलीभाषेत लसीकरण व लस संबंधित मार्गदर्शन केले. गावातील भांगा रामा वसावे यांनी प्रथम लस घेऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन सुरूपसिंग वसावे यांनी केले. यशस्वीतेसाठी विजेसिंग के. वसावे, अमरसिंग वसावे, श्यामसिंग वसावे, रायसिंग वळवी, मंगलसिंग जांबोरे, राजू वळवी, छत्रसिंग वळवी, भीमसिंग वळवी, गणेश पावरा, विजेसिंग वसावे, जितेंद्र पवार, प्रदीप नाईक, सीमा तडवी, मनीषा पाटील, संगीता वसावे, मीना वसावे, किसन वसावे, रायसिंग वसावे, रवींद्र वसावे, नानसिंग वसावे आदींनी परिश्रम घेतले.