यावेळी भांगा रामा वसावे, डॉ.अजित कोठारी, मुख्याध्यापक सुनील मावची, विजा वेस्ता वसावे, रणधीर भामरे, पोलीसपाटील नानसिंग वसावे, वेस्ता गोवल्या वसावे आदी उपस्थित होते. डॉ.कोठारी यांनी स्थानिक बोलीभाषेत लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. वेस्ता वसावे यांनी स्वतःहून लस घेण्यास पुढाकार घेऊन इतरांना लस घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सुरूपसिंग वसावे यांनी केले. शिबिरासाठी सुरूपसिंग वसावे (वालंबा), विजेसिंग वसावे (होराफळी), अमरसिंग वसावे, श्यामसिंग वसावे, रायसिंग वळवी, मंगलसिंग जांबोरे, राजू वळवी, छत्रसिंग वळवी, भीमसिंग वळवी, गणेश पावरा, विजेसिंग वसावे, जितेंद्र पवार, प्रदीप नाईक, सीमा तडवी, मनीषा पाटील, अंगणवाडीसेविका संगीताबाई वसावे, आशा कार्यकर्ती मीनाबाई वसावे, ग्रामपंचायत कर्मचारी किसन वसावे, रायसिंग वसावे (ओढी), रवींद्र वसावे, पोलीसपाटील नानसिंग वसावे, शिक्षण व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ओढी येथे १३२ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST