लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा दौ:यावर आलेल्या आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी जिल्ह्यातील अंगणवाडय़ा, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भेटी देत सोयी सुविधांचा आढावा घेतला़ भेटीदरम्यान काकर्दा ता़ धडगाव येथील आरोग्य केंद्रात शासनाने बंदी घातलेल्या कंपनीच्या औषधांचा साठा दिसून आला़ सोमवारी सकाळी विवेक पंडीत यांनी पातोंडा ता़ नंदुरबार येथील अंगणवाडी केंद्रात भेट दिली़ याठिकाणी एकही तीव्र कुपोषित बालक नसल्याचे समितीचे अध्यक्ष पंडीत यांना सांगण्यात आले होत़े यावेळी त्यांनी रजिस्टरची तपासणी केली असता, तशी नोंदही आढळून आली़ परंतू रजिस्टरमधील नोंदी आणि मुलांची अवस्था पाहून त्यांनी एका बालकाची तपासणी केली़ यात बालकाचे वजन कमी आढळून ते तीव्र कुपोषित असल्याचे सिद्ध झाल़े रजिस्टरमध्ये त्याची नोंद कुपोषित बालक करण्यात आली होती. व त्याला कुपोषित बालकाची ट्रीटमेंट दिली गेली़ तसेच अंगणवाडीतील मुलांची पटसंख्या व त्यांना दिला जाणारा आहार व इतर आकडेवारी जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आढळली. यावेळी विवेक पंडित यांनी बालकविकास प्रकल्प अधिकारी यांना अंगणवाडीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. समितीच्या दौ:यात शहरालगत पहिल्याच अंगणवाडीच्या पाहणीत समोर आलेली परिस्थिती बघता ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल असे सांगत आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी चिंता व्यक्त केली़ दरम्यान विवेक पंडीत यांनी रामपूर ता़ शहादा येथील आश्रमशाळेत भेट दिली़ यानंतर त्यांनी काकर्दा ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली होती़ भेटीदरम्यान हिंदुस्थान लॅॅबोरेटरी नामक कंपनीचा प्रमाणपेक्षा अधिक औषधसाठा त्यांना दिसून आला़ संबधित कंपनी ही दुस:याकडून औषधी बनवून पुरवठा करत असल्याने शासनाने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आह़े असे असतानाही येथे कंपनीचा स्टॉक आढळून आल्याने आरोग्य अधिकारी व संबधित वैद्यकीय अधिकारी यांनी मंगळवारी होणा:या बैठकीवेळी कागदपत्रांसह माहिती सादर करण्याच्या सूचना त्यांनी भेटीदरम्यान केल्या़
काकर्दा येथील आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या समस्येसह धडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकाम आणि त्याच्या दर्जावर समिती अध्यक्ष पंडीत यांनी बोट ठेवल़े ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम मार्च 2015 मध्ये पूर्ण करावयाचे असतानाही त्यात दिरंगाई झाल्याने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश त्यांनी दिल़े धडगाव येथील महिला रुग्णालय, शासकीय आयटीआय येथील कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान भांगरापाणी आश्रमशाळेच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याने या कामाबाबत मंगळवारच्या बैठकीत उत्तर सादर करण्याचे आदेश प्रकल्प कार्यालयाला दिल़े