शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदेच्या जलाशयावर मासेमारीचा अनोखा केज कल्चर प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 13:44 IST

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नर्मदेच्या जलाशयावर मासेमारीचा अनोखा केज कल्चर प्रकल्प साकारला असून या प्रकल्पाने हजारो ...

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नर्मदेच्या जलाशयावर मासेमारीचा अनोखा केज कल्चर प्रकल्प साकारला असून या प्रकल्पाने हजारो बाधितांना रोजगार दिला आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या अथक प्रयत्नातून या प्रकल्पाला चालना मिळाली असून त्याला शासनानेही साथ दिली आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्पामुळे नर्मदा काठावरील गावांचे पुनर्वसन सुरू आहे. दुसरीकडे सरदार सरोवर प्रकल्पाचे कामही पूर्णत्वास येत असल्याने या प्रकल्पामुळे सातपुडा आणि विंध्याचल पर्वताच्या दरम्यान नर्मदेचे मोठे जलाशय निर्माण झाले आहे. या पाण्याचा नर्मदा काठावरील लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने नर्मदा बचाव आंदोलनाने त्याठिकाणी स्थानिकांना मासेमारीचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. सातत्याने   त्यासंदर्भात पाठपुरावा व संघर्ष केल्यानंतर हा प्रकल्प साकारला आहे. सुरुवातीला यासंदर्भात २०१३ मध्ये नर्मदा नवनिर्माण मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित चिमलखेडी, ता.अक्कलकुवा या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यात १४६    मच्छीमार सभासदांची नोंदणी झाली. या संस्थेने या उपक्रमाला सुरुवात केली. पुढे २०१४ मध्ये       पुन्हा नवीन चार सहकारी संस्था स्थापन झाल्या. त्यातही ४०६ मच्छीमार सभासदांची नोंदणी  झाली. या संस्था स्थापन झाल्यानंतर शासनानेही त्यासाठी आंदोलकांच्या प्रयत्नांना सकारात्मक साथ दिली. त्यासाठी सुरुवातीला संस्था चालविण्यासाठी प्रत्येक संस्थेला ५० हजारांचे भागभांडवल देण्यात आले. तसेच प्रत्येक   संस्थेसाठी १० नावड्या, दोन इंजिन बोट, एक बोलेरो पीकअप, १४६ शीतपेट्या दिल्या. तसेच मासेमारीसाठी प्रत्येक सभासदाला पाच किलो कंडाल पुरविण्यात आले. याशिवाय प्रत्येक संस्थेलाही ४८ पिंजरे व सुरुवातीला मत्स्य बीज आणि मत्स्य खाद्य देण्यात आले. या उपक्रमाचे सकारात्मक प्रतिसाद दिसू लागल्याने शासनाने पुन्हा नावाड्या व सूतजाळे पुरविले. या प्रकल्पामुळे चिमलखेडी, मणिबेली, चिंचखेडी, शेलगदा, खर्डी तसेच डनेल, भादल, थुवानी, सावऱ्या दिगर या नर्मदा काठावरील गावांना लाभ होत असून तेथील नागरिकांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे.लोकांना चांगला रोजगार मिळू लागल्यानंतर पुन्हा विविध गावांमध्ये नवीन पाच संस्था स्थापन करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर अजून नवीन सभासद त्यासाठी पुढाकार घेत असून भरड, सिंधुरी, धनखेडी व गमण या चार गावांनादेखील संस्था स्थापन करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.

नर्मदा काठावरील अर्थकारणाला गतीमासेमारीच्या केज कल्चर प्रकल्पामुळे नर्मदा काठावरील अर्थकारणाला गती मिळाली आहे. या प्रकल्पातून प्रत्येक संस्थेला वार्षिक सुमारे १० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र मासे विक्रीसाठी अद्यापही प्रभावी बाजारपेठ उपलब्ध नाही. अजूनही स्थानिक स्तरावरच मासे विक्री होत असल्यामुळे भावदेखील पुरेसा मिळत नाही. त्यामुळे येथील मासे उत्पादनात वाढ करून विक्रीसाठी मोठी बाजारपेठ तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षणही देण्यासाठी प्रयत्न हवा. यासंदर्भात नर्मदा बचाव आंदोलनाने मच्छीमार संस्थांचा महासंघ स्थापन करून त्यासंदर्भात प्रकल्पाची व्यापकता व बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला शासनानेही सहकार्य करण्याची गरज आहे.

नर्मदेच्या जलाशयाचा ठेका कोणत्याही बाहेरच्या ठेकेदाराला न देता विस्थापितांचा अधिकार कायम राहिला पाहिजे व सहकारी संस्थेच्या प्रतिनिधींना जास्तीत जास्त प्रशिक्षण देऊन मत्स्य खाद्य, मत्स्य बीज व मासे विक्रीसाठी सरकारकडून सहाय्य मिळायला हवे.-सियाराम पाडवी, चेअरमन, नर्मदा नवनिर्माण मच्छीमार संस्था, चिमलखेडी, ता.अक्कलकुवा. 

नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून व संघर्षामुळेच नर्मदेच्या जलाशयावर लोकांना अधिकार मिळाला आहे. तो हक्क अबाधीत    रहावा व लोकांचे जीवनमान उंचविण्यासाठी आंदोलनातर्फे सतत संघर्ष सुरुच राहील.-लतिका राजपूत, नर्मदा बचाव आंदोलन.