Unique activities on the corner of 'Home There Tree' | ‘घर तेथे झाड’चा कोपर्लीत अनोखा उपक्रम
‘घर तेथे झाड’चा कोपर्लीत अनोखा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गावाची, समाजाची उतराई होण्यासाठी अनेकजण उपक्रम राबवितात, असाच एक उपक्रम कोपर्ली, ता.नंदुरबारचे रहिवासी आणि स्टॅम्प वेंडर संघटनेचे अध्यक्ष भिका चौधरी यांनी राबविला आहे. पर्यावरणाचा संदेश देत त्यांनी ‘घर तेथे झाड’ लावले. त्याचे संरक्षण करून संगोपनाची जबाबदारी त्या त्या कुटूंबाला दिली. दीड हजार घरे, झोपडय़ांसमोर आणि शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र परिसर असे मिळून जवळपास सहा हजार वृक्ष त्यांनी आतार्पयत लागवड केली आहेत. 
गावात जन्मलो, शिक्षण, नोकरी निमित्त दुस:या गावात, शहरात राहिलो आणि तेथेच स्थायिक झाल्यानंतर अनेकजण आपल्या गावाला विसरतात. परंतु काहीजण त्याला अपवाद असतात. आपल्या गावाची उतराई होण्यासाठी, लहानपणाच्या आठवणी गावासोबत घालविण्यासाठी काहीजण गावात उपक्रम राबवून गावाशी नाळ जुळवून ठेवतात. त्यातीलच कोपर्ली, ता.नंदुरबार येथील भिका जगन्नाथ चौधरी. वैयक्तिक उपक्रम राबविण्यापेक्षा त्यांनी सर्वाना सामावून घेत आईच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. कमलाबाई जगन्नाथ चौधरी ट्रस्टच्या माध्यमातून ते गावात विविध उपक्रम राबवित आहेत.
कोपर्ली, तापी काठावर वसलेले गाव, परंतु पर्यावरणाचा असमतोलामुळे गावात उन्हाळ्यात तीव्र तापमानाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता चौधरी यांनी ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपणाला महत्त्व दिले. घर तेथे झाड हा उपक्रम त्यांनी तीन वर्षापासून राबविला आहे. वृक्ष        लागवड करतांना एक किंवा दीड फुटाचे रोप न लावता थेट चार ते सहा फुटाचे रोप लावले जाते. त्यासाठी संरक्षक जाळी पुरविली जाते. ज्याच्या घरासमोर किंवा झोपडीसमोर वृक्ष लावले त्याच्याकडे संगोपनाची जबाबदारी. केवळ    सावली देणारे नाही तर त्यापासून काही उत्पादन येईल असे रोपे लागवड त्यांनी केली. त्यात  अशोका, बदाम, आंबा, नारळ, लिंब, बकुळ, पोष्टानपंप, जासवंती, रातराणी, सेवंती, चाफा, मोगरा, गुलमोहर, चांदणी, कन्हेर यासह इतर फळ पिकांचा समावेश आहे. आता ही रोपे मोठी झाली असून अंगणात सावली देखील मिळत आहे. लवकरच फूल व फळधारणा होण्यास सुरुवात होणार आहे. 
त्यांच्या या उपक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी वेळोवेळी भेटी देत त्यांचा उत्साह वाढविला आहे. याशिवाय कोपर्लीचे सरपंच, युवक आणि रोटरी क्लब, नंदनगरी, मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ यांचेही सहकार्य लाभले. या उपक्रमासह गावातील गुणवंत विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्य वाटप, ग्रामपंचायीला शवपेटी देखील त्यांनी पुरविली आहे. पर्यावरणाचा अनोखा संदेश देणा:या या उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा आहे. 
 

Web Title: Unique activities on the corner of 'Home There Tree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.