लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बॅनर, बोर्ड, फ्लेक्स, होर्डिंग्ज विनापरवाना लावले असल्यास ते काढून संबधितांकडून खर्च वसूल करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने हेरंब सर्व्हिसेस यांना अधिकृत संस्था म्हणून नेमणूक केली आहे. शहरातील विविध चौकात, रस्त्यांवर, विद्युत पोलवर विनापरवानगी जाहिरात बोर्ड, फ्लेक्स तसेच वाढदिवस, निवड, अभिनंदन यांचे होर्डिंग्ज, फलक लावण्यात आले आहेत. सार्वजिनक मालमत्तेवर कुठल्याही ठिकाणी असे बोर्ड लावले जात आहेत. त्यामुळे शहरातील चौक व मुख्य रस्ते यांचे विद्रूपीकरण होत आहे. ही बाब लक्षात घेता पालिकेने अशा लोकांवर कारवाईचे ठरविले आहे. त्यासाठी मात्र पालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे हेरंब सर्व्हिसेस यांना ठेका दिला आहे. ते पालिकेला जाहिरात कर फी वसुली करून देत अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स हटविणार आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात अनधिकृत बोर्ड, फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्ज काढून घ्यावे. अन्यथा संबंधितांकडून त्याचा खर्च वसूल करून सार्वजनिक जागेचे विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील पालिकेने वेळोवेळी कारवाई केली आहे, परंतु पुन्हा जैसे थे परिस्थिती राहत असते.
अनधिकृत बॅनर, फलकांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:25 IST