उदेसिंग पाडवींच्या राष्टÑवादीतील एन्ट्रीने भाजप आणि काँग्रेसमध्येही हलचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:56 PM2020-09-13T12:56:47+5:302020-09-13T12:56:54+5:30

माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकताच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्याचे पडसाद राष्टÑवादीबरोबरच काँग्रेस आणि भाजपमध्येही पडणार आहे. ...

Udesingh Padvi's entry into the NCP also caused a stir between the BJP and the Congress | उदेसिंग पाडवींच्या राष्टÑवादीतील एन्ट्रीने भाजप आणि काँग्रेसमध्येही हलचल

उदेसिंग पाडवींच्या राष्टÑवादीतील एन्ट्रीने भाजप आणि काँग्रेसमध्येही हलचल

Next


माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकताच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्याचे पडसाद राष्टÑवादीबरोबरच काँग्रेस आणि भाजपमध्येही पडणार आहे. त्यामुळे राष्टÑवादी काँग्रेसमधील एक गट पाडवींच्या प्रवेशाने उत्साहीत असला तरी दुसऱ्या गटात तसा उत्साह दिसून येत नाही. तर त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला काहीसे नुकसानकारक असून भाजपला ती मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही हलचल व्यक्त होत आहे.
पाडवींची राष्टÑवादीत एन्ट्री
तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी मुंबईत दोन दिवसापूर्वीच राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश राष्टÑवादीला निश्चितच संजीवनी देणारा ठरणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासोबत धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनीही राष्टÑवादी सोडल्याने हा पक्ष तसा कमकुवत झाला होता. त्यामुळे गेल्या सात महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हा पक्ष चांगली कामगिरी करू शकला नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अद्यापपर्यंत नियुक्त झालेला नाही. जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यात दोन गट आहेत. अशा स्थितीत उदेसिंग पाडवी यांनी या पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाला संजीवनी मिळाल्यासारखे कार्यकर्त्यांमध्ये प्रतिक्रिया आहेत. उदेसिंग पाडवी हे गेल्या अडीच-तीन दशकांपासून राजकारणात असून दोनवेळा त्यांनी शिवसेनेतर्फे तर एकवेळा भाजप आणि एकवेळा काँग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यात भाजपतर्फे ते आमदार झाले होते. एकनाथ खडसे यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या राजकारणाचा मोठा प्रवास असल्याने त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा गट आहे. त्याचा फायदा राष्टÑवादीला निश्चित होईल.
काँग्रेसमध्ये हलचल
पाडवी यांनी काँग्रेसमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रवेश केला होता. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आले असले तरी पाडवी यांच्यासारखा कार्यकर्ता पक्षात ठेवून पक्षाला बेरजेचे राजकारण करता आले असते. परंतु निवडणूक झाल्यानंतर पाडवींबाबत पक्षाने फारसा विचार केला नाही. उलट त्यांना विश्वासात न घेता डावलले जात असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांचे कार्यक्षेत्र तळोदा तालुका होता. पण नंदुरबारमधून निवडणूक लढविल्याने पक्षातील काही वरिष्ठ नेते पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातच थांबवून तेथेच त्यांनी पक्ष वाढवावा असा अप्रत्यक्ष टोला लगावत होते. शिवाय अंतर्गत कुठल्याही कार्यक्रमात त्यांना महत्त्व न दिले गेल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. वास्तविक संवाद व समन्वयातून त्यांना जर काँग्रेसने पक्षांतरापासून रोखले असते तर निश्चितच काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यास त्यांचा फायदा झाला असता.
भाजपमध्ये अस्वस्थता
पाडवी यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला असला तरी तळोदा-शहादा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र आतापासूनच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे सध्या या मतदारसंघात पाडवी यांचेच पुत्र राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यापुढील प्रत्येक राजकीय कार्यक्रमात या पिता-पुत्रांचा राजकीय मतभेदातील थोडेफार परिणाम भाजप कार्यकर्त्यांना सोसावेच लागणार आहेत. आगामी निवडणुकीत राजेश पाडवी यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आणि राष्टÑवादीतर्फे उदेसिंग पाडवी यांना उमेदवारी मिळाली तर या पिता-पुत्रांच्या लढाईचा परिणामही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सहन करावा लागणार असल्याने आणि ते अडचणीचेही ठरणार असल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
त्यामुळे एकूणच उदेसिंग पाडवी यांच्या राष्टÑवादीतील प्रवेशाने राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षात कसे परिणाम होतील हा येणारा काळच ठरवेल. पण त्याबाबत मात्र तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
 

Web Title: Udesingh Padvi's entry into the NCP also caused a stir between the BJP and the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.