लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा ते धडगाव दरम्यान असणाऱ्या चांदसैली घाटात दरवर्षीप्रमाणे रस्ता खचण्याच्या सत्राला सुरूवात झाली आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी केला जाणार खर्च निरर्थक ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या घाटात अनेक ठिकाणी संरक्षण कठड्यांचीदेखील दुरवस्था झाली असल्याने प्रवासात प्रवाशांचा जीव टांगणीला असल्याचे दिसून येते.चांदसैली घाट हा सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक व प्रेक्षणीय घाट म्हणून प्रसिध्द आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. पावसाळ्यात घाटातील रस्ता ठिकठिकाणी खतच असल्याने बºयाचदा घाट मार्गातील वाहतूक बंद होत असते. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्याला ठिकठिकाणी मोठे भगदाड पडत असल्याचा अनुभव आहे. खचणाºया रस्त्याच्या दुरूस्तीसाठी व रस्ता खचू नये यासाठी भराव तसेच संरक्षक भिंत बांधण्यासाठी दरवर्षी लाखों रूपयांची कामे संबंधित विभागामार्फत केली जातात. मात्र दरवर्षी पहिल्याच पावसात घाटातील रस्ता नेहमी प्रमाणे खचत असल्याने कामाची गुणवत्ता व उपयोगिता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.नागमोडी वळणे, खोल दरी, अरूंद रस्ता यामुळे चांदसैली घाटात वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रस्त्यावर दरळी कोसळलेल्या दरळी, तीव्र चढाव व उतार, खचलेला रस्ता, रस्तावर माती व चिखल, संरक्षक कठड्यांचा अभाव व दुरावस्था यामुळे घाटातील वाट अधिक बिकट बनली आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनधारकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. तारेवरची कसरत करीत वाहनधारकांना घटमार्गात वाहने मार्गस्थ करावी लागत असतात.घाट मार्गात अनेक अत्यावश्यक ठिकाणी रस्त्याच्या कडेला संरक्षण काठड्यांचा अभाव असल्याचे दिसून येते. घाटात अनेक ठिकणी संरक्षक कठड्यांची अत्यावश्यक गरज असून, त्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या अनेक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ताच्याकडेला असणाºया खोल दरीत एखादे वाहन दुर्देवाने अनियंत्रित होऊन किंवा अनावधानाने वाहन गेल्यास ते थेट ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण घाटमार्गात संरक्षक कठडे बसविण्याची गरज आहे.चांदसैली घाटातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही भाग हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. मागील काही वर्षापासून घाटात रस्ता खचणे व त्याच्या दुरूस्तीसाठी निधी खर्च करण्याचे चक्र सुरू आहे. लाखों रूपये खर्च करून घाटातील रस्त्याची दैनावस्था जैसे थेच राहत असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
चांदसैली घाटात रस्ता खचण्याचे प्रकार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:59 IST