महालक्ष्मी नगरमध्ये सुविधांचा वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:46 PM2019-12-16T12:46:45+5:302019-12-16T12:46:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन ...

Type of facilities in Mahalaxmi Nagar | महालक्ष्मी नगरमध्ये सुविधांचा वाणवा

महालक्ष्मी नगरमध्ये सुविधांचा वाणवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील सर्व्हे नंबर २८ मध्ये पालिकेने सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या रस्ते, गटारी आणि ओपन प्लेसच्या विकासाची कामे रखडल्याने या भागात असुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पालिकेने त्वरीत सुविधात्मक कामे सुरू करावीत अशी मागणी रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे.
यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा, महालक्ष्मी नगर सर्व्हे नं. २८ मधील नागरिक या भागात गेल्या २० वर्षांपासून रहिवास करीत आहेत. या भागात रस्ते, गटारींसह विविध सविधा उपलब्ध नसल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या भागात रस्ते, गटारी व ओपन प्लेसचा विकास व्हावा यासाठी पालिका दरबारी तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींकडे तगादा लावूनही या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या भागात असुविधांचा महापूर वाहत आहे. रस्ते नसल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. त्यातच सांडपाण्याची सोय नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच रस्त्यावर सांडपाणी येवून अशा पाण्यावर डास मच्छरांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शेजारी प्रभाग क्रमांक चारमध्ये विकासात्मक कामे होत आताना या भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे . असा दुजाभाव का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
शहादा पालिकेने शहरातील सर्वच ओपन प्लेस विकसित करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने ओपन प्लेसचा विकासही केला जात आहे. परंतु या भागातील सर्व्हे नं. २८ मधील ओपन प्लेस विकासाची प्रतिक्षा करीत आहे. या ओपनप्लेस विकसीत करावा या संदर्भातील विषय सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असतांना हा ओपन प्लेस का विकसीत केला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ओपन प्लेस विकसीत न झाल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वराहांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे प्रशासनाने या भागाकडे जातीने लक्ष देवून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवून सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा मुलभूत सुविधांसाठी वेळोवेळी पालिकेविरूद्ध येथील नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल व होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार राहिल आसा ईशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे. दरम्यान नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनाही नागरिकांनी निवेदन दिले.
निवेदनावर दीपक चौधरी, वसंत बागले, दिनेश बाशिंगे, अनिल वाणी, जितेंद्र मोरे, कन्हैया पाटील, प्रकाश भोई, कुंदन चौधरी, नरेंद्र दीक्षित, महेंद्र बडगुजर, मनोज चौधरी, योगेश सावंत, सुनील आहिरे, नाना बिºहाडे, सुरेंद्र ढोडरे, प्रविण भावसार आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Type of facilities in Mahalaxmi Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.