शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहादानजीक कार अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

By मनोज शेलार | Updated: June 29, 2023 17:45 IST

दोन जेसीबी मागवून कारला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.

नंदुरबार : नियंत्रण सुटून कार उलटल्याने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना शहादा-डोंगरगाव रस्त्यावर महावीर स्कूलनजीक गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. भरधाव कार तीनदा उलटून झाडाला धडक बसल्याने कार चक्काचूर झाली. मयतांमध्ये अमरसिंग धनसिंग गिरासे (२९) रा. लोणखेडा व विजय श्रावण सोनवणे (२६) रा. डोंगरगाव, ता. शहादा अशी मयतांची नावे आहेत.

गिरासे हे आपल्या कारने (क्रमांक एम.एच.१५-एच.जी. ९८०१) शहादाकडून डोंगरगावकडे जात असताना सकाळी साडेनऊ वाजता महावीर इंग्लिश स्कूलच्या समोर काही अंतरावर गाडीवरील त्याचा ताबा सुटला. पावसाच्या रिपरिपमुळे कार नियंत्रित न झाल्याने तीनवेळा उलटली. रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात उलटून लिंबाच्या झाडाला धडकली. वरील दोन्ही जण कारमध्येच दाबले गेल्याने जागीच ठार झालेत. यावेळी कारमधील एअरबॅग उघडल्या तरीही दोन्ही जण वाचू शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लोणखेडा व डोंगरगाव येथे अपघाताचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोन जेसीबी मागवून कारला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. लोणखेडा येथील गणेश रघुनाथ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मदतकार्य केले. कारचे तुटलेले काही भाग रस्त्यावर विखुरलेले होते. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेत रहदारी सुरळीत केली. पंचनामा करून शहादा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली. डोंगरगाव येथील मयत विजय सोनवणे हा अमरसिंग गिरासे याच्याकडे कामाला असल्याची माहिती मिळाली. दोन्ही जण आपल्या कारने खासगी कामानिमित्त डोंगरगाव कडे जात होते. पावसामुळे कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात