शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

दोन आठवड्यातच अतिक्रमण ‘जैसे थे’

By admin | Published: March 27, 2017 12:09 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिखाऊपणा : तिन्ही चौफुलींवरील स्थिती

नंदुरबार : दोन आठवड्यांपूर्वी वाघेश्वरी चौफुलीवरील काढण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले आहे. दर दोन वर्षांनी असे प्रकार सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा नाकर्तेपणा की, अतिक्रमणधारकांची मुजोरी? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच स्थिती कोरीट चौफुली व नवापूर रोड चौफुलीवरील आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे या भागात अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाºया वाघेश्वरी चौफुलीवर साक्री, नवापूर, धुळे तसेच वळण रस्ते येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी विविध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय थाटले आहेत. परिणामी चौफुलीवर वर्दळ वाढली आहे. त्याचा परिणाम अपघात वाढण्यात झाला आहे. हा परिसर व येथे येणारे सर्व रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची निगा राखणे, डागडुजी करणे, ठरावीक काळानंतर नवीन रस्ते तयार करणे, अशी कामे करावी लागतात. शिवाय अतिक्रमण वाढले असल्यास ते लागलीच काढण्याची मुभादेखील या विभागाला असते. वाघेश्वरी चौफुलीच्या चारही बाजूंनी असलेले अतिक्रमण दोन आठवड्यांपूर्वी बांधकाम विभागाने काढले होते. जवळपास ३० ते ४० कच्ची अतिक्रमणे नेस्तानुभूत करण्यात आली होती. काहींनी स्वत:हून टपरी, लहान दुकाने, हातगाडीवरील दुकान काढून घेतले होते. त्यामुळे हा परिसर विस्तृत व मोकळा झाला होता. परिणामी वाहनांना उभे राहण्यास जागा तसेच प्रवाशांनादेखील ते सोयीचे झाले होते. अतिक्रमण काढल्यानंतर लागलीच त्या ठिकाणी काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. शिवाय पुन्हा अतिक्रमण होणार     नाही, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या.पुन्हा जैसे थे...अतिक्रमण काढलेल्या जागी पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या जागेवर जी टपरी, दुकान होते, ते पुन्हा ठेवण्यात आले आहे. याशिवाय मांस विक्रेत्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे प्रयोजन काय होते, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. चौफुलीच्या चारही भागांत ३० ते ४० जणांनी दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमण केले आहे. या ठिकाणी वाहनांची वर्दळ, गतिरोधकाचा अभाव यामुळे अपघातदेखील वाढले आहेत. वाहतूक पोलिसांनाही ताणया ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येते. परंतु चारही बाजूंनी अतिक्रमणामुळे त्यांनाही रहदारी नियमन करताना ताण सहन करावा लागतो.