लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिजामाता औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.आर.एस.चौधरी यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही प्राध्यापकासह व्यापाऱ्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आणखी काही जणांची नावे तपासात समोर येण्याची शक्यता आहे. प्रा.मुकेश वाडेकर, प्रा.रवींद्र साळुंखे व व्यापारी अनिल चौधरी यांचा समावेश आहे. दरम्यान, डॅा.नंदकिशोर शिंदे, रा.चांदवड, सुभाष राठोड, तांबेसर रा.नाशिक, सलीन धानोरकर, सौरभ श्रीवास्तव, शंकर मानवतार, रा.मुंबई, सुनील महाजन रा.शहापूर यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडाली असून आणखी कुणाची नावे समोर येतात याकडे लक्ष लागून आहे.
व्यापाऱ्यासह दोघा प्राध्यापकांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:28 IST