लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ३१ जानेवारीचा रविवार हा पोलिओ रविवार म्हणून पाळण्यात येणार आहे. जिल्हाभरातील शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक लाख ९२ हजार बालकांना पोलिओ लस पाजली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी ही मोहिम राबविली जाणार होती, परंतु कोरोना लसिकरणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत जिल्हाभरातील एक हजार ९९५ केंद्रांवर लसिकरण करण्यात येणार आहे. वीटभट्टी, रेल्वे व बसस्थानक यासह इतर ठिकाणी देखील लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी व वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अशी असेल पोलिओ लसिकरण मोहीम...
- ऊसतोड कामगार, विटभट्टी मजूर, बांधकाम व रस्त्यावरील कामे करणारे मजूर यांच्या मुलांच्या नोंदणीकडे विशेष लक्ष देऊन त्यांना पोलिओ लस दिले जाणार आहे.
- एकुण चार हजार ८०७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात ४,४७० तर शहरी भागात ३३७ कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे.
- पर्यवेक्षकांमध्ये ग्रामीण भागात ३७६ तर शहरी भागात २९ असे एकुण ४०५ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
- गृहभेटीद्वारे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २,९७६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पर्यवेक्षकांची संख्या ३१४ इतकी आहे. तीन दिवस १,४८८ पथके राहणार आहेत.
० ते ५ वयोगटातील लाभार्थी१,९२,२३४एकुण बूथ१,९९५मणुष्यबळ४,८०७पर्यवेक्षक४०५
आरोग्य संस्था१५०
मोबाईल पथक८६
ट्रांझिट पथक६८