लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना बाधीत आणि संशयीतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभुमिचा वापर केला जात असल्यामुळे नवीन स्मशानभुमिवर त्याचा फारसा ताण पडत नसल्याची स्थिती आहे. नव्या ठिकाणी चार अंत्यसंस्कारासाठी चार स्टॅण्ड असल्याने वेटींग राहत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, इतर धर्माच्या मयतांवर त्यांच्या स्मशानभुमित अंत्यसंस्काराची केले जात आहे.इतर शहरांमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या अधीक असल्याने स्मशानभुमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावी लागत असल्याची स्थिती आहे. नंदुरबारात मात्र अशी कुठलीही स्थिती नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किंवा कोरोना संशयीतांवर नंदुरबारतच अंत्यसंस्कार केले जात आहेत.तीन महिन्यात १०० पेक्षा अधीक जणांवर कोरोना नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.अशा रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी पालिकेने जुन्या स्मशानभुमीची जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार अर्थात अग्निसंस्कार केले जातात. त्यासाठी दोन जणांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पालिकेने या ठिकाणी लाकूड उपलब्ध करून दिले आहे. पीपीई किट आणि इतर कचरा उचलण्याची लागलीच सोय करण्यात येते.नवीन स्मशानभुमीत मात्र नेहमीप्रमाणेच अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी चार शवदाहिनीची सोय आहे.त्यामुळे एकाच वेळी चार जणांवर येथे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात अशी सोय आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी वेटींग राहत नसल्याची स्थिती आहे.
पालिकेच्य स्मशानभुमीसह इतर धर्मातील किंवा समाजातील व्यक्तीचा कोरोना किंवा कोरोना संशयीत म्हणून मृत्यू झाल्यास त्यांच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्या येतात. तशी सोय त्या त्या समाजाने आणि धर्माने केली आहे.