शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बचत गटांनी तयार केले अडीच लाख मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 5:11 PM

या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहाशे महिलांना रोजगार : २२ लाखांची विक्रीसंचारबंदीमुळे उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही फटका बसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना संसगार्मुळे लॉकडाउन व संचारबंदीमुळे उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही फटका बसला असून, रोजंदारीने काम करणाऱ्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व बचत गटांना मास्कची निर्मिती करण्याच्या केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील २११ बचत गटांनी प्रतिसाद दिला आहे. या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.

        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर गेल्या महिन्यापासून संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आले असून, त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. विशेष करून ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांची ससेहोलपट होत आहे. लहान-मोठे उद्योगही बंद पडल्याने गावोगावी कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील महिलांच्याही हातातील कामे बंद पडल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून महिला बचत गटांना आर्थिक मदत देऊन मास्क तयार करण्याचे काम दिले. त्यासाठी काही बचत गटांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील २११ महिला बचत गटांनी प्रतिसाद दिला. सध्या बाजारपेठेत मास्कची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी बचत गटांनी गेल्या काही दिवसांतच दोन लाख ३८ हजार मास्क तयार केले. त्याची विक्री स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना करण्यात येऊन महिलांना रोजगार निर्मितीबरोबरच २२ लाख रुपयांची उलाढालही झाली. महिला बचत गटांना मास्क निर्मितीतून रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा हातभार लागल्याचे बनसोड यांनी सांगितले.चौकट===अंतराचे भानमास्क बनविण्यासाठी लागणारी शिलाई मशीन प्रत्येकीकडे नसल्याने इतरही बचतगटाच्या महिलांना एकत्र केले व प्रत्येकीने स्वत:च्या घरी राहूनच डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून काम पूर्ण केले. ग्रामस्तरावर मास्क बनविण्याच्या कल्पनेमुळे गावागावात कोरोना आजाराविषयीची जनजागृतीही झाली व गावपातळीवर अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्या माध्यमातून मास्कचे महत्त्व कळाले. त्याचबरोबर महिलांच्या घरखर्चाला हातभार लागला.- देवयानी पाटील, अध्यक्ष, बचत गट

टॅग्स :Socialसामाजिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद