मिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:58 PM2021-01-28T12:58:09+5:302021-01-28T12:58:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चुरडामुरडा आणि खराब वातावरण यामुळे मिरची उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला होता. यातून बऱ्याच ...

Turnover stagnated with chilli inflows | मिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका

मिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चुरडामुरडा आणि खराब वातावरण यामुळे मिरची उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला होता. यातून बऱ्याच जणांचे मिरची उत्पादन उशिराने बाजारात आले आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून नंदुरबार बाजारपेठेत मिरची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवापासून मिरचीची भरमसाठ आवक होत असून पाच ते तीन हजार क्विंटल मिरची आवक दरदिवशी होत आहे.
जिल्ह्यात २०२० च्या खरीप हंगामात ६ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड करण्यात आली होती. यात सर्वाधिक ५ हजार ६३५ हेक्टर मिरची लागवड नंदुरबार तालुक्यात करण्यात आली होती. शहादा ९२६, नवापूर ३५, तळोदा ७७, अक्कलकुवा ७३ तर धडगाव तालुक्यात १० हेक्टरवर मिरची लागवड केली गेली होती. लागवडीनंतर काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी खराब हवामानामुळे मिरची झाडांचे नुकसान होऊन उत्पादनापासून शेतकरी मुकले होते. यातून शेतकऱ्यांनी दुबार मिरची लागवड केल्याने नोव्हेंबरपासून मिरची आवक होण्यास प्रारंभ झाला होता. यातून गेल्या आठवड्यापर्यंत ४५ हजार क्विंटल मिरची आवक झाल्याचे सांगण्यात आले होते. शेतकरी नंदुरबार येथील बाजार समितीला सर्वाधिक पसंती देत असल्याने याठिकाणी ही आवक झाली आहे. दरम्यान, ओल्या मिरचीला २ हजार ७०० तर सुक्या मिरचीला ५ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. यातच २० जानेवारीपासून मिरची आवक वाढण्यास सुरुवात झाली होती. २१ व २२ जानेवारी रोजी थेट पाच हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. तर २५ रोजी तीन हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे. या आवकवाढीचा थेट फायदा व्यापारी वर्गाला बसत असून १ लाख क्विंटलच्या आत संपणारा मिरची हंगाम १ लाखाचा टप्पा पार करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने विक्रीसाठी येणारी मिरची ही नंदुरबार, शहादा आणि लगतच्या गुजरात राज्यातून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असून हंगामाच्या शेवटी हे आकडे कोट्यवधीच्या घरात जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Turnover stagnated with chilli inflows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.