शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आदिवासी मौखिक साहित्य परिषद व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसावद येथे आदिवासी सांस्कृतिक सन्मान महोत्सव घेण्यात आला. या सोहळ्यात आदिवासी संस्कृती, साहित्य व चालीरितींचे जतन करणा:यांना गौरविण्यात आले.महोत्सवात आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, सेवानिवृत्त वनअधिकारी नामदेव पटले, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे संयोजक भिमसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे, दामू ठाकरे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी देविदास बोरसे, पं.स. सभापती वांगीबाई पावरा, पं.स.चे माजी सभापती दरबारसिंग पावरा, सुरेश नाईक, वनिताबाई पटले, चिमण ठाकरे, हरी खराडे, राजू जाधव, प्रदीप गावीत, दारासिंग ठाकरे, रतिलाल पवार, काशीराम ठाकरे, कुवरसिंग पाडवी, सत्तरसिंग ठाकरे, सहदेव वाघ, गणेश ठाकरे, वसंत भंडारी, खेत्या वळवी, भूरसिंग पवार, आपसिंग निकुंभ, अशोक शेमले,  देवीसिंग पावरा, दिगंबर पावरा, काशीराम पावरा आदी उपस्थित   होते. वाहरू सोनवणे म्हणाले की, आदिवासी हा उत्सवप्रिय समाज असल्याने प्रत्येक आदिवासीने जोरदार उत्सव साजरे केले पाहिजे. परंतु विविध आमिषे प्रलोभने देत नाचायला लावतील, त्यांच्यापासून जरा सावधच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. आदिवासी लग्नातील गीते व ढोलसह अन्य पारंपरिक वाद्यांचा आवाज, ताल-सूर यांचा निसर्गाशी कसा संबंध येतो हे त्यांनी विविध गाणी व आवाजातून पटवून दिले. आदिवासी संस्कृती, गीते व अन्य सर्वच माध्यमातून फसवणूक होत आहे यापासून सावध राहण्याचे आवाहन करीत आपली संस्कृती, गीते, चालीरीती दूषित झाल्या आहे, हे केवळ भोगवादी विचारांचा शिरकाव झाल्यामुळे झाल्याचे सिद्ध केले. आज शासनामार्फत भजनी साहित्य दिले जात आहे. ते घ्या परंतु आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणारी भजने म्हटली गेली पाहिजे, अशी अपेक्षाही सोनवणे यांनी व्यक्त केली. राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, आदिवासी संस्कृती व चालीरीती अप्रतिम असल्यामुळे यावर संशोधने होत आहे. त्यामुळे ही संस्कृती, चालीरीती टिकल्या पाहिजे. परंतु त्यासाठी अत्यल्प प्रय} होत आहे. ही संस्कृती जतन करीत संवर्धनासाठी जे प्रय} करीत आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठीच अधिक योगदान देत आहेत. प्रत्येक आदिवासीने आपले हक्क व स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. साहित्यिक विश्राम वळवी यांनी आकाश-पाताळ व प्रकृतीशी आदिवासींच्या नाळ जुळल्या हे स्पष्ट करताना आकाशवाणीचे पहिले संगीत आदिवासींच्या गीतांमधून घेतल्याचे सांगितले. किसन महाराज यांनी आदिवासींचा भूतकाळ, वर्तमान व भवितव्य यावर प्रकाश टाकला. वनिताबाई पटले यांनी आदिवासींचे शिक्षण, मौखिक व लिखित साहित्यावर मार्गदर्शन केले. नरेंद्र पाडवी यांनी आदिवासी संस्कृतीचे प्रतीक ढोल या वाद्याचे, घडण, शास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व पटवून दिले.