कृती आराखडा समन्वयासाठी प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:42 PM2020-09-23T12:42:41+5:302020-09-23T12:42:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोहयोचे लेबर बजेट, नियोजन व सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या कृती आराखड्यावर चर्चेसाठी २७ ...

Training classes for delegates for action plan coordination | कृती आराखडा समन्वयासाठी प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्ग

कृती आराखडा समन्वयासाठी प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्ग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोहयोचे लेबर बजेट, नियोजन व सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या कृती आराखड्यावर चर्चेसाठी २७ गावांच्या लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यासह वन व्यवस्थापन समिती सदस्य यांचे प्रशिक्षण घेण्यात आले़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले़
शासनाने रोजगार हमी योजनेंंतर्गत गावे समृद्ध व्हावीत यासाठी शेती आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनावर भर देत २०२०-२१ च्या वार्षिक नियोजनाचे कृती आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार त्या-त्या गावात जाणीव जागृती करत त्यांच्या सहभागातून गावात घ्यावयाच्या कामांसाठी हे कृती आराखडे बनवले जाणार आहेत़ यात धडगांव, तळोदा, नंदुरबार व अक्कलकुवा तालुक्यात लोकसमन्वय प्रतिष्ठानतर्फे २७ सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये वनव्यवस्थापन व संवर्धनासाठी कृती आराखडे बनवण्याचे काम ही सुरू करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर या २७ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, रोजगारसेवक वन विभागाचे वनक्षेत्रपाल, कृषी विभाग व रोजगार हमी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात आले़ प्रसंगी प्रतिभा शिंदे यांनी रोजगार हमी योजना व त्या अनुषंगारे निघालेले नवीन शासन आदेश, सामूहिक वनहक्क क्षेत्रात करावयाची व्यवस्थापन व संवर्धन कामे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले़
रोहयोचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनीही मार्गदर्शन केले़ जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पराडके यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदवला़ या वेळी या गावांचा परिपूर्ण आराखडा बनवून या गावांना समृद्ध बनवू असा संकल्प करण्यात आला़

Web Title: Training classes for delegates for action plan coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.