लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरीपाडा गावाजवळ रस्त्यावर असलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनांचे दररोज अपघात होत असून सोमवारी एका ट्रकचा पाटा तुटल्याने रस्त्याच्या मध्यभागी अडकला तर दुसरा कंटेनर खड्डय़ात फसल्याने वाहतूक पूर्णपणे प्रभावीत झाली होती.नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या महिनाभरापासून अत्यंत धोकादायक झालेला असून या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातल्या त्यात पेचरीदेव येथील पुलाला कठडे नसल्याने धोकादायक झालेला आहे. तेथे मोठमोठे खड्डे तयार झालेले असल्याने अपघातही वाढले आहेत. या खड्डय़ांमध्ये वाहने अडकून वाहतुकीची दररोज कोंडी होत असल्याने प्रवाशांचे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका:यांनी हे खड्डे तातडीने बुजविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी त्रस्त वाहनधारक करीत आहेत.
रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहतूक वारंवार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:16 IST