लॉकडाऊनचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:40 PM2020-04-03T12:40:39+5:302020-04-03T12:42:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या ...

Traders take advantage of lockdowns | लॉकडाऊनचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक

लॉकडाऊनचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या सहकार्याने त्यावर तोडगाही निघाला. शेतीमाल वाहतुकीसाठी रितसर परवाना घेऊन वाहतुकीस परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. परंतु या लॉकडाऊनचा फायदा घेत पपई खरेदीदार व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. चार रुपये प्रती किलोप्रमाणे पपईची खरेदी सुरू असून अचानक भाव कोसळल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे. यंदा उशिराने लागवड झाल्याने फळधारणाही उशीराच झाली. त्यामुळे ऐन बहरात असताना व्यापाºयांनी अनेकवेळा हंगामात शेतकºयांना दरासंबंधी वेठीस धरले होते. आता तर कोरोनाचे कारण पुढे करत शेतकºयांना पुरते मेटाकुटीस आणले आहे. पपई हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकºयांना त्याचा साठाही करता येत नाही. शिवाय बाजारपेठ जवळपास नसल्याने स्वत:ही विकणे अवघड होते. त्यामुळे सर्वस्वी व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागत आहे. पपई खरेदीदार व्यापारी मात्र संधीचे सोने करण्याची तसूभरही संधी सोडत नाहीत हे आजपर्यंत घडलेल्या घटनांवरून जाणवते. वास्तविक पाहता बाहेरील राज्यांमध्ये पपईची ठोक विक्री १६ ते १७ रुपयांप्रमाणे सुरू आहे. व्यापाºयांना माल खरेदी करून संबंधित बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सहा रुपये प्रती किलोप्रमाणे खर्च येत असल्याचे सांगितले जाते. तरीही शेतकºयांकडून चार रुपये किलोप्रमाणे खरेदी सुरू आहे. यात मात्र शेतकरी होरपळत आहे.

४लॉकडाऊन असलेल्या परिस्थितीत प्रशासनाने शेतीमाल वाहतुकीसाठी मुभा दिली असली तरी व्यापारी शेतकºयांच्या मालाला तोडणीसाठी धजावत नव्हते. शहादा पालिकेचे नगरसेवक संदीप पाटील यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व व्यापारी यांच्यात एक बैठक घेऊन माल तोडणीसंबंधी तोडगा काढला व शेतकºयांच्या मालाला तोडण्याचे आवाहन केले. मात्र दरासंबंधीचा तोडगा अद्यापही कायम आहे. तो तोडगा निघावा व शेतकºयांची होणारी होरफळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.

शेतकºयांची पपई झाडावरच पिकत होती. लॉकडाऊनचे कारण पुढे करत व्यापारी तोडणीस धजावत नव्हते. प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक घेऊन पपई तोडणीसंबंधी तोडगा निघाला. परंतु दराबाबतची समस्या अजूनही कायम आहे.
-संदीप पाटील, नगरसेवक व पपई उत्पादक शेतकरी, शहादा.

Web Title: Traders take advantage of lockdowns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.