धावलघाटात ट्रॅक्टर उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:00 PM2020-11-19T22:00:26+5:302020-11-19T22:00:36+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव :  शहादा ते धडगाव दरम्यान धावलघाटात मजूरांनी भरलेले ट्रॅक्टर उलटून ३५ च्या जवळपास मजूर ...

The tractor overturned at Dhawalghat | धावलघाटात ट्रॅक्टर उलटले

धावलघाटात ट्रॅक्टर उलटले

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव :  शहादा ते धडगाव दरम्यान धावलघाटात मजूरांनी भरलेले ट्रॅक्टर उलटून ३५ च्या जवळपास मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर जखमी मजूरांना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 
धडगाव तालुक्यातील वलवाल मोखाचापडा  येथील मजूर ऊसतोडणीसाठी शहाद्याकडे जात होते. दरम्यान दावलघाटात या मजूरांचे ट्रॅक्टर आल्यानंतर अचानक ट्राॅली उलटून मजूर त्याखाली दाबले गेले. अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांना शक्य होते त्यांनी उड्या मारुन जीव वाजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कूटूंब आणि संसारोपयोगी साहित्यासह हे मजूर कामाच्या ठिकाणी निघाले होते. काहींसोबत लहान मुलेही होती. या अपघातात तीन पुरूष व एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विजय पराडे, ॲड. छोटू वळवी, रेहमल पावरा, फिरंग्या पावरा यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेत जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती असून जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. 
दरम्यान धडगाव ते शहादा हा रस्ता खराब झाला असल्याने अपघात घडला असावा अंदाज आहे. सध्या मोठ्या संख्येने मजूर दुर्गम भागातून स्थलांतर करत आहेत. यासाठी ते मिळेल त्या वाहनाचा वापर करत असून यातून अपघाती स्थिती निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडेही गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

Web Title: The tractor overturned at Dhawalghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.