लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तंबाखूजन्य पदार्थ व तंबाखू विक्री करण्यास प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे. असे असतांनाही अक्कलकुवा येथे बेकायदेशीररित्या तंबाखू विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश राजेश परदेशी, रा.शिवनेरी चौक, अक्कलकुवा असे संशयीताचे नाव आहे. आकाश परदेशी हा राहत्या घरात तंबाखू विक्री करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. विभागाच्या पथकाने घरी जावून तपासणी केली असता तेथे तीन हजार २४० रुपये किंमतीचे तंबाखूचे पाकिट आढळून आले. ते अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले आहे. याबाबत अन्न सुरुक्षा अधिकारी दिनेश ज्ञानेश्वर तांबोळी यांनी फिर्याद दिल्याने आकाश राजेश परदेशी यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक डी.डी.पाटील करीत आहे. दरम्यान, अक्कलकुवा येथे यापूर्वी देखील अशा प्रकारची कारवाई प्रशासनाने केलेली आहे.
अक्कलकुवा येथे तंबाखूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:32 IST