शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

यंदा लेझीमवर पाय थिरकणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्याची लय यंदा दिसणार नाही. ढोल, ताशा यांचा गजरही ऐकायला मिळणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील गणेशोत्सवातील लेझीम नृत्याची लय यंदा दिसणार नाही. ढोल, ताशा यांचा गजरही ऐकायला मिळणार नसल्याचे स्पष्टच आहे. कोरोनामुळे मिरवणुका रद्द झाल्याने मंडळ कार्यकर्त्यांंनी यंदा सराव देखील केला नाही.नंदुरबारच्या गणेशोत्सवाच्या वेगळेपणा येथील लयबद्ध पद्धतीने खेळली जाणारी लेझीम एक वेगळे आकर्षण आहे. कालानुरूप बदल येत गेला असला तरी लय मात्र तीच आहे. पूर्वी गणेश मेळ्यांमध्ये होणारे लेझीमनृत्य विविध तालीम संघांमध्ये स्पर्धा करणारे ठरायचे. दोन पाऊलपासून ११ पाऊल लेझीम नंदुरबारची एक वेगळी ओळख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत जेवढीही मंडळे सहभागी होतात ते सर्व लेझीमच खेळतात. त्यामुळे वेगवेगळ्या मंडळांची ही लेझीम नृत्य पहाण्याचीही मजा काही औरच असते.यंदा मात्र या सर्व प्रकाराला फाटा दिला गेला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर आलेली मर्यादा आणि त्या अनुषंगाने रद्द करण्यात आलेल्या मिरवणुका यामुळे यंदा ढोल, ताशे आणि त्यावर खेळण्यात येणारी लेझीम दिसणार नसल्याचे स्पष्ट आहे.जुनी परंपरा कायमलेझीम नृत्याची परंपरा पूर्वीपासूनच आहे. पूर्वी ढोल-ताशांऐवजी संभळ वाद्यावर ती खेळली जात असे. त्याची वेगळीच लय राहत होती. कालांतराने मोठे आवाज करणारे ताशे, ढोल आले. त्यांनी संभळची जागा घेतली. ढोल व ताशांच्या आवाजामुळे नृत्यात अधिकच जोश येऊ लागल्यामुळे ही वाद्ये तरुणांच्या पसंतीस उतरली आणी संभळ मागे पडले. आज प्रत्येक मंडळात कमीतकमी पाच ते सात ढोल व तेवढीच ताशे असतात. त्यांच्या ठेक्यावर लेझीम खेळली जाते. पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुका दोन ते अडीच दिवस चालत असे. त्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे गट करून ठरावीक वेळासाठी ते लेझीम खेळत असत. त्यानंतर दुसरा गट लेझीम खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या शैली पहाण्याची मजाही येत असे. गेल्या काही वर्षांपासून ते चित्र राहिले नसल्याच दिसून येते.डीजेच्या गर्दीतही लेझीम टिकूनसध्या डीजे, बॅन्जोचा जमाना असला तरी नंदुरबारातील गणेश मंडळांनी पर्यायाने तालीम संघांनी लेझीमची परंपरा टिकवून ठेवली आहे. प्रत्येक मंडळ ढोल, ताशे यांच्याशिवाय दुसरे वाद्य वाजवित नसतात. काही तालीमसंघाची तर खास लेझीम पथकेही आहेत.या पथकांना जिल्ह्यातूनही विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. लेझीम शिकविणारेदेखील शहरात आहेत. त्यांना गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासून मंडळाच्या कार्यकर्त्याना शिकविण्यासाठी पाचारण केले जाते असते.यंदा मात्र रात्रीच्या वेळी मंडळांकडून लेझीमचा सराव नाही, ढोल, ताशांचा सराव नाही की कुणी त्यांना शिकविणारे येत नाही. त्यामुळे मंडळांच्या परिसरात सध्या शांतता आहे. रात्रीची संचारबंदी असल्यामुळे आणि सजावट व आरासला यंदा फाटा असल्यामुळे कार्यकर्त्यांना उशीरापर्यंत थांबून तयारी करण्याचेही कष्ट राहिले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, काही मंडळांनी आपल्या नेहमीच्या जागेवर मंडप उभारून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची तयारी सुरू केली आहे.प्रशासनाने यंदा गणेश मूर्ती स्थापना आणि विसर्जन मिरवणुका काढण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासून मंडळ कार्यकर्ते लेझीमचा सराव करीत असतात. यंदा मात्र हा सराव देखील बंद आहे.विसर्जन मिरवणुकीत लेझीम खेळण्याचे युवकांमध्ये खास आकर्षण असते. त्यामुळे अनेकजण लेझीम शिकण्यासाठी या काळात प्रयत्न करतात.नंदुरबारातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होणारी २५ पेक्षा अधीक मंडळांकडे लेझीम खेळणाऱ्या युवकांचे पथके आहेत.