कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १०१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:49 AM2020-04-02T11:49:33+5:302020-04-02T11:49:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तसाठा देखील घटला होता. त्यामुळे रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर ...

Three donors donated blood on the background of Corona | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १०१ जणांनी केले रक्तदान

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर १०१ जणांनी केले रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तसाठा देखील घटला होता. त्यामुळे रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यानंतर अनेक संघटना व संस्था पुढे आल्या. शिवसेनेने देखील रक्तदान शिबिर घेतले १०१ रक्तदात्यांनी त्यात सहभाग घेतला.
शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सध्य स्थितीत असलेला कमी रक्तसाठा लक्षात घेता भगवती लॉन्स, करण चौफुली नंदुरबार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात विक्रांत मोरे यांच्यासह १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात स्रियांचाही सहभाग होता. रक्तदात्यांसाठी जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रक्तदात्याना प्रमाणपत्र देऊन त्याचे आभार देखील मानण्यात आले. एकट्या आसाणे गावातील २० जणांनी एकाचवेळी रक्तदान केले.
या वेळी डॉ.राजेश वसावे, सेनेचे उपजिल्हप्रमुख देवेंद्र जैन, नगरसेवक मनोज चव्हाण, अर्जुन मराठे, युवासेनेचे अर्जुन सुधाकर मराठे, प्रवीण गुरव , जितेंद्र मराठे, मनीष बाफना, जीवन माळी, महेंद्र झंवर, रामकृष्ण पाटील, हितेश कासार, तसेच जिल्हा रुग्णालयचे डॉ. एस. ए. सांगळे, डॉ. अविनाश चकोर, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, हेमंत माळी, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Three donors donated blood on the background of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.