शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणपुरी येथे चोरट्यांचा खाद्यतेलावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणपुरी येथे शहादा-खेतिया रस्त्यावर किराणा दुकाने आहेत. त्यांनी आपल्या अंगणात नेहमीप्रमाणे खाद्यतेलाने भरलेले बॅरल ठेवले ...

सविस्तर वृत्त असे की, ब्राह्मणपुरी येथे शहादा-खेतिया रस्त्यावर किराणा दुकाने आहेत. त्यांनी आपल्या अंगणात नेहमीप्रमाणे खाद्यतेलाने भरलेले बॅरल ठेवले होते. नेहमीप्रमाणे दीपक जैन हे मंगळवारी सकाळी किराणा दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना १८० लिटरच्या खाद्यतेलाचे बॅरल दिसून आले नाही. त्यांनी लागलीच परिसरात शोध घेतला असता जवळच असलेल्या पारसमल जैन व राकेश तावडे यांचेदेखील १८० किलोच्या खाद्यतेलाचे बॅरल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. ब्राह्मणपुरी येथील तिन्ही किराणा दुकानदारांचे प्रत्येकी एक-एक खाद्यतेलाचे बॅरल लंपास करून चोरांनी पोबारा केला. एका बॅरलची किंमत २२ ते २३ हजार असून, तिन्ही बॅरलची किंमत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.

एकाच रात्री नियोजन पद्धतीने चोरी

एकाच रात्री चोरट्यांनी नियोजनात्मक पद्धतीने खाद्यतेल लंपास केल्याची बाब उघडीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील किराणा दुकानासह शेतकऱ्यांच्या शेतीउपयोगी वस्तूदेखील बाहेर उघड्यावर राहत असल्याने अशाप्रकारे चोरीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे. तसेच पोलिसांची रात्रीची गस्त कमी झाल्याने चोरट्यांना चोरी करण्याचे धाडस निर्माण होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसविण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.