लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कांदा उत्पादक शेतकरी आणि आडतदार यांना समान लाभ होऊन व्यवहारात सुटसुटीतपणा यावा यासाठी नंदुरबार बाजार समितीच्या आवारात कांद्याची स्वतंत्र बाजारात साकारली जाणार आह़े बाजारपेठेच्या या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी रविवारी बाजार समितीत आडददार आणि व्यापारी यांची बैठक होणार आह़े नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात अडीच ते तीन हजार हेक्टर कांदा लागवड केली जात़े यातील येणा:या 100 टक्के उत्पादनापैकी 75 टक्के उत्पादन हे नंदुरबार बाजार समितीत शेतकरी विक्रीसाठी आणतात़ यात लगतचे गुजरात राज्य आणि साक्री तालक्यातील कांदा उत्पादक येथे कांदा विक्रीसाठी घेऊन येत असल्याने व्यवहार केले जात होत़े परंतू भाजीपाला बाजारासोबत कांद्याची खरेदी विक्री होत असल्याने आडतदार आणि शेतकरी यांना अडचणींना सामोरे जावे लागत होत़े या अडचणी वाढत असल्याने अखेर बाजार समिती प्रशासनाने भाजीपाला बाजारातून कांद्याला वेगळा काढण्याचा निर्णय घेतला होता़ या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवारी आडतदारांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा होणार आह़े नव्याने आकारास येणारी ही कांदा बाजारपेठ बाजार समिती कार्यालयाच्या बाजूला शेडमध्ये सुरु होणार आह़े स्वतंत्र बाजारामुळे आवक वाढण्याचा अंदाज बाजार समितीने वर्तवला आह़े
बाजार समितीत होणार कांद्याचा स्वतंत्र बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:56 IST