शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

दहा महिन्यात सातपुडय़ात एक दिवाही चकाकला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 11:59 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मार्च 2018 र्पयत सातपुडय़ातील सर्व गावे व पाडे विद्युतीकरणाने लख्ख चकाकणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी 17 मे 2017 ला मोलगी येथे केली होती. मात्र, दहा महिन्यानंतर सर्व पाडे तर सोडा, नवीन एक दिवाही लागू शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही सातपुडा अंधारातच असल्याचे चित्र आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘मार्च 2018 र्पयत सातपुडय़ातील सर्व गावे व पाडे विद्युतीकरणाने लख्ख चकाकणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी 17 मे 2017 ला मोलगी येथे केली होती. मात्र, दहा महिन्यानंतर सर्व पाडे तर सोडा, नवीन एक दिवाही लागू शकला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही सातपुडा अंधारातच असल्याचे चित्र आहे.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सर्वत्र विकासाचा गप्पा होत असतांना जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या रांगांमध्ये विस्तारलेले धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावे व पाडे अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. विशेषत: इतर सुविधा तर सोडा, पण अनेक गावांर्पयत अद्याप वीज पोहचू शकलेली नाही. या दोन्ही तालुक्यातील 735 पाडे व 84 गावांमध्ये अद्यापही वीज पोहचलेली नाही. त्यातील अक्कलकुवा तालुक्यातील 34 गावे आणि 311 पाडे तर धडगाव तालुक्यातील 50 गावे आणि 424 पाडय़ांचा समावेश आहे. या गावांमध्ये विद्युतीकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्यावर्षी 17 मे 2017 ला अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी व भगदरी येथे विकास कामांच्या पहाणीसाठी आले होते. त्यावेळी मोलगी येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सातपुडय़ातील विद्युतीकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्यासमोर जी गावे व पाडे विजेअभावी अंधारात आहेत त्या गावांचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्या गावांना विद्युतीकरणासाठी एकुण 180 कोटी 62 लाखांचा निधी अपेक्षीत असल्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यावेळी त्यांनी या सर्व गावांमध्ये मार्च 2018 अखेर्पयत विद्युतीकरण पुर्ण करण्याचे आदेश अधिका:यांना देवून पत्रकारांशीही बोलतांना मार्च 2018 अखेर्पयत गावे लख्ख चकाकतील असे आश्वासन दिले होते.      प्रत्यक्षात मुख्यमंत्री गेल्यानंतर गेल्या दहा महिन्यात विद्युतीकरणाचा  प्रस्ताव लाल फितीतच राहिला. त्यासाठी नवीन निधी मिळाला नाही आणि कामेही सुरू झालेली नाहीत.वास्तविक सातपुडय़ातील गावे आणि पाडय़ांचे विद्युतीकरणासाठी 1991 पासून योजना सुरू आहे. त्यासाठी मध्यंतरीच्या काळात निधीही मिळाला होता. काही ठिकाणी विजेचे खांब टाकण्यात आले. पण तार नाही, काही ठिकाणी केवळ खड्डेच खोदण्यात आले. त्यामुळे प्रस्तावातील गावांव्यतिरिक्तही अनेक गावे आणि पाडय़ांमध्ये विजेची बोंब आहे. त्याचेही सव्र्हेक्षण होऊन दुरूस्तीची आवश्यकता आहे. आज सर्वच कामे विजेवरील यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने सातपुडय़ातील आदिवासींनाही विजेची गरज भासते. परंतु विज नसल्याने त्यांच्या दैनंदिन जिवनात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. इतर कामे तर सोडा, पण आज दळणवळणाचे मुख्य साधन झालेल्या मोबाईलच्या चाजिर्गसाठीही सुविधा नसल्याचे चित्र आहे. मोबाईलची रेंज डोंगरद:यार्पयत पोहचली. त्यामुळे आदिवासी युवकांच्या हातात मोबाईलही दिसू लागले आहेत. पण चाजिर्गसाठी त्यांना रोज आठ ते दहा किलोमिटरची पायपीट करावी  लागते. जिल्ह्यात एकुण 930 गावे व 2991 पाडे असून त्यापैकी 845 गावे व 2023 पाडय़ांचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. 85 गावांचे विद्युतीकरण बाकी असून त्यापैकी केवळ एका गावाचा विद्युतीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 84 गावे आणि 735 पाडय़ांचे विद्युतीकरण शिल्लक आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील 34 गावे आणि 311 पाडे तर धडगाव तालुक्यातील 50 गावे व 424 पाडय़ांचा समावेश आहे. या गावांचा व पाडय़ांचा विद्युतीकरणासाठी 180 कोटी 62 लाख रुपये निधी लागणार असून त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.एकुणच विजेअभावी सातपुडय़ाचा विकासही खुंटला आहे. आज या जिल्ह्याला मागासपणातून बाहेर काढण्याचे प्रशासनापुढे आव्हान बनले असतांना मुलभूत सुविधांकडेही शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आदिवासींमध्ये नाराजीच्या भावना व्यक्त होत आहेत.