शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार : कुपोषित बालकांना रुग्णालयात बेडसाठी ‘वेटिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 07:45 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण पुढे करून बेड्स आरक्षित केल्याची घटना समोर. बेड्सच्या अभावी बालकांचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण?, उपस्थित करण्यात येतोय प्रश्न.

ठळक मुद्देकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण पुढे करून बेड्स आरक्षित केल्याची घटना समोर.बेड्सच्या अभावी बालकांचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण?, उपस्थित करण्यात येतोय प्रश्न.

रमाकांत पाटीलनंदुरबार : वेळेवर उपचार न मिळाल्याने आधीच अनेक कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण सांगून बेड आरक्षित केल्यामुळे कुपोषित बालकांनाही रुग्णालयात बेडसाठी ‘वेटिंग’ असल्याची संतापजनक बाब समाेर आली आहे. मात्र या बेड आरक्षित करण्यामुळे बालकाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सक्षम आरोग्य सेवा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र बोलबाला झाला होता.

विशेष आरोग्य मोहिमेमुळे कुपोषित बालकांची संख्या प्रचंड वाढल्याने पोषण पुनर्वसन केंद्रे फुल्ल झाली आहेत. आतापर्यंत शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या चार तालुक्यांतील ९४ हजार ९२ बालके तपासण्यात आली असून, त्यात अतितीव्र कुपोषित दाेन हजार ४५२, तर मध्यम कुपोषित १२ हजार ७९ बालके आढळून आली आहेत. अर्थात अद्यापही निम्म्या बालकांची तपासणी बाकी असल्याने हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. 

पोषण केंद्रात जागा नसली तरी, रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या जनरल हॉलमधील बेड देऊन कुपोषित बालकांना दाखल करून घेण्याची पालकांची अपेक्षा होती. मात्र संबंधित बेड संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्याच्या प्रशासनाच्या सूचना असल्याने त्या बेडवर कुपोषित बालकांना उपचारासाठी दाखल करता येणार नाही, असे उत्तर संबंधित वैद्यकीय सूत्रांकडून मिळत आहे.

अनेक बालके गंभीरतपासणी सुरू असताना अतितीव्र कुपोषित बालकांमध्ये अनेक बालके गंभीर स्वरूपात आजारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या बालकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी स्वतंत्र आरोग्य पोषण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी एकही बालक नसलेली ही केंद्रे आता फुल्ल झाली आहेत.

अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण केंद्रात केवळ १० बेड आहेत. मात्र, तेथे १२ बालकांना दाखल केले आहे. रुग्णालयातील काही बेड कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. गणेश पवार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अक्कलकुवा.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रnandurbar-acनंदुरबार