नंदुरबारात घरफोडीत 49 हजार रुपयांच्या ऐवजची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:33 PM2018-01-18T12:33:05+5:302018-01-18T12:33:40+5:30

Theft of Rs 49 thousand rupees in the house in Nandurbar | नंदुरबारात घरफोडीत 49 हजार रुपयांच्या ऐवजची चोरी

नंदुरबारात घरफोडीत 49 हजार रुपयांच्या ऐवजची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील भाग्योदय नगरातून घरफोडीत चोरटय़ांनी 49 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना 14 रोजी घडली. घरमालक बाहेरगावाहून परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
भाग्योदय नगरातील प्लॉट क्रमांक 32 अ मध्ये राहणारे व पंचायत समितीमधील वाहनचालक अनिल निंबा पाटील हे बाहेरगावी गेले होते. 14 ते 15 जानेवारी या दोन दिवसात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटातील 49 हजार रुपयांची रोख रक्कम चोरटय़ांनी चोरून नेली. अनिल पाटील हे बाहेरगावाहून परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने उपनगर पोलिसात कळविल्यावर पंचनामा करण्यात आला.  चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मोरे करीत आहे.

Web Title: Theft of Rs 49 thousand rupees in the house in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.