आॅनलाईन लोकमतनंदुरबार, दि.१६ : पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात येणार होती. त्यासाठी पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. परिणामी उमेदवार यादी जाहीर होऊ शकली नाही. गुरुवारी ती वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.भाजपच्या उमेदवारांच्या निवडीवरून यापूर्वी देखील चर्चा रंगली होती. आधी आमदार उदेसिंग पाडवी यांनी काही उमेदवारांची नावे जाहिर केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षा डॉ.हिना गावीत यांनी पक्षाच्या प्रक्रियेप्रमाणे इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात नावे जाहीर झालेल्यांचाही समावेश होताच.आता अंतिम उमेदवारी यादी बुधवारी जाहीर करणार असल्याचे सांगून त्यासाठी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सर्व संबधितांना निरोपही देण्यात आले होते. परंतु सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचा निरोप देण्यात आला.गुरुवारी भाजपचे जिल्हा निरिक्षक लक्ष्मण सावजी, पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत उमेदवारी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.या प्रकारामुळे मात्र शहरात चर्चा रंगली आहे. यापूर्वी देखील उमेदवार जाहीर करण्याची घाई करण्यात आली. आता देखील तोच प्रकार होणार होता, परंतु वरिष्ठानी ऐनवेळी सूत्रे फिरविल्याने तो प्रकार टळला आहे. कार्यकर्ते देखील यामुळे संभ्रमात पडले आहेत.
तळोदा नगरपालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 16:46 IST
वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार यादीची घोषणा
तळोदा नगरपालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त टळला
ठळक मुद्देभाजपाची यादी जाहीर होणार वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीतऐनवेळी पत्रकार परिषद रद्द झाल्याचा आला निरोपनिवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते देखील संभ्रमात