पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून उपाययोजना करा- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:31 AM2021-05-07T04:31:40+5:302021-05-07T04:31:40+5:30

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी ...

Take measures by identifying the dangerous places in the rainy season - Collector | पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून उपाययोजना करा- जिल्हाधिकारी

पावसाळ्यातील धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून उपाययोजना करा- जिल्हाधिकारी

googlenewsNext

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे आदी उपस्थित होते.

डॉ. भारुड म्हणाले, मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू नये, केवळ दुरुस्तीची कामे करण्यात यावी. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे. धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे.

कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तत्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.

आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. प्रथमोपचार गटाची बांधणी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय करावी. कार्यकारी अभियंता आणि तहसीलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.

सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाच्या ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात.

नगरपालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पर्जन्यमान आदी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. पुरवठा विभागाने आपत्ती काळात पुरेसा धान्यसाठा वितरणाबाबत नियोजन करावे. महावितरणने आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Take measures by identifying the dangerous places in the rainy season - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.