शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
3
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
4
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
5
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
6
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
7
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
8
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
9
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
10
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
11
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
12
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
13
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
14
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
15
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
16
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
17
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
18
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
19
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
20
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड

खाजगी रुग्णालये जादा बिलं घेत असल्यास कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयांना कोरोनावर उपचाराची परवाणगी देण्यात आली आहे. त्यांना शासकीय दरही ठरवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयांना कोरोनावर उपचाराची परवाणगी देण्यात आली आहे. त्यांना शासकीय दरही ठरवून देण्यात आले आहे. असे असतांना जादा बिलं काढल्याच्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आल्यास थेट कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी आढावा बैठकीत दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.अ‍ॅड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त स्वॅब तपासणीसाठी फिरत्या पथकांची व्यवस्था करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरीत उपचार सुरू करण्यात यावे. नागरिकांनीदेखील लक्षणे आढळल्यास वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी. खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दरानेच सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची संबंधितांनी दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालय वाढीव दराने बिल देत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या सातत्याने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यामातून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत.या प्रयत्नांना नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडल्यावर शारिरीक अंतर राखावे व हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनेटायझर लावावे.अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. खावटी योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलीत करा राज्य शासनामार्फत ११ लाख ५५ हजार कुटुंबाना खावटी अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वंचित आदिवासी बांधवाची माहिती संकलीत करण्यात यावी. योजनेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी.शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना शिधापत्रिका देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत नवापूर, शहादा, चिंचपाडा तसेच अक्कलकुवा येथे कोविड रुग्णासाठी कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था, रोजगार हमी योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, खरीप पीक कर्ज, वनदावे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस प्रातांधिकारी, तहसिलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.धुळे येथे पालकमंत्र्यांसमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळचा लाठीमारची घटना राज्यभर गाजली. नंदुरबारला देखील पालकमंत्र्यांची बैठक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तसेच पालकमंत्री जाणार असल्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपनाच्या मुख्य प्रवेशद्वारासह मिटिंग हॉल आणि इतर ठिकाणी बंदोबस्त होता.