शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्केच खतांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा होणार आहे़ गत आठवड्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा होणार आहे़ गत आठवड्यात पावसाने हजेरी दिल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे़ यासाठी लागणारे बियाणे आणि खते यांची मागणी आहे़ यात बियाणे मुबलक स्वरुपात उपलब्ध असले तरी जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत केवळ ५० टक्के खत साठा उपलब्ध असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात १ लाख १८ हजार १६० मे. टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने केली होती़ यातून कृषी संचालनालयाने ९८ हजार ९३० मेट्रीक टन खत साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे़ मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून २५ हजार ५२७ मेट्रीक टन एवढे रासायनिक खत जिल्ह्यात उपलब्ध होते़ उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी तसेच मिश्र खतांची आवक करण्यावर भर देण्यात आल्याने खत टंचाई टळणार असल्याचे बोलले जात होते़ दरम्यान गेल्या काही दिवसात लॉकडाऊनमुळे जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या खत रॅकला विलंब होत होता़ यातून जिल्ह्यात रासायनिक खतांचा साठा मर्यादित झाला आहे़ यातच कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांना शेतकऱ्यांना युरीयासोबत मिश्र खत देण्याच्याही सूचना केल्या असल्याने अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ परंतू मिश्र खते ही शेतीसाठी उपयुक्त असल्याने ती शेतकºयांनी युरियासोबत वापरुन पिकांना नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस द्यावा अशी अपेक्षा कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे़ यातून जिल्ह्यात खतांची टंचाई निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे़दरम्यान काहीअंशी असलेली ही टंचाई ३० जूनपर्यंत प्राप्त होणाºया रॅकमधून संपणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़कृषी विभागाने यंदाच्या हंगामासाठी ७० हजार २६० मेट्रीक टन युरिया, ७ हजार ८५० मेट्रीक टन डीएपी, ७ हजार ८४० मेट्रीक टन एमओपी, ११ हजार ५०० मेट्रीक टन एसएसपी तर २० हजार ७१० मेट्रीक टन मिश्र खतांची मागणी केली होती़ यातून जिल्ह्यात ४७ हजार ३०० मेट्रीक टन यूरीया, ५ हजार २०० डीएपी, ९ हजार ८०० एमओपी, १७ हजार १५० एसएसपी तर १९ हजार ४८० मेट्रीक टन मिश्र खते मंजूर करण्यात आली आहेत़४मंजूर केल्यापैकी जिल्ह्यात सद्यस्थितीत १८ हजार २१ मेट्रीक टन युरिया उपलब्ध आहे़ २ हजार ५१४ मेट्रीक टन डीएपी, १ हजार ८१९ मेट्रीक टन एमओपी, १३ हजार ९७ मेट्रीक टन एसएसपी तर १२ हजार ७९३ मेट्रीक टन मिश्र खते उपलब्ध आहेत़जिल्ह्यात मागणी केलेल्या १ लाख १८ हजार मेट्रीक टन खतापैकी ९८ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाल्यानंतर ते तातडीने प्राप्त होण्याची अपेक्षा होती़ परंतू याउलट स्थिती सध्या जिल्ह्यात असून आजअखेरीस केवळ ३३ हजार ५१० मेट्रीक टन खताचा प्रत्यक्षात पुरवठा करण्यात आला आहे़ यातही मागणील १७ हजार ८४५ मेट्रीक टन खत साठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात आजअखेरीस केवळ ५१ हजार ३५५ मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत़कृषी विभागाने म्हटल्यानुसार येत्या आठवड्यात खतांचे रॅक प्राप्त होणार आहे़ टंचाईत वाढ होवू नये यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकºयांनी लागेल तेवढेच खत खरेदी करण्याचे सूचित केले आहे़जिल्ह्यात शेतकºयांसाठी खत उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ केवळ युरियाची खरेदी न करता शेतकºयांनी मिश्र खते खरेदी केली पाहिजेत़ यात प्रामुख्याने नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फरस यांचा अंतर्भाव असलेल्या पिकांवर भर दिला पाहिजे़ योग्य त्या पद्धतीने विभागाकडून खतांचे वितरण सुरु आहे़ सर्व विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत़ भरारी पथकांना सूचना केल्या आहेत़-प्रदीप लाटे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबाऱखरीप हंगामात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी होणे प्रस्तावित आहे़ सर्वाधिक १ लाख २२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाचे नियोजन आहे़ यासाठी कृषी विभागाने ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदवली होती, यापैकी ३१ हजार ६७ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे़ विभागाने २६ हजार क्विंटल बियाणे मागणी केली होती़ यापैकी १ हजार ८७८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आहे़ महाबीज आणि खाजगी कंपन्यांनी जिल्ह्यात बियाण्यांचा पुरवठा केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे़