पोलीस अधिक्षकांची सीमा तपासणी नाक्यावर पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:35 PM2020-05-22T12:35:34+5:302020-05-22T12:35:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांचा वाढता राबता पाहता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी ...

Superintendent of Police inspects the border check post | पोलीस अधिक्षकांची सीमा तपासणी नाक्यावर पाहणी

पोलीस अधिक्षकांची सीमा तपासणी नाक्यावर पाहणी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : सीमा परिवहन तपासणी नाक्यावर परप्रांतीय मजूर व कामगारांचा वाढता राबता पाहता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी गुरुवारी येथे भेट देउन परिस्थितीची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
गुजरात राज्यातुन दररोज हजारो परप्रांतीय मजुर व कामगारांचे नवापुर सीमा तपासणी नाक्यावर येणे सुरु आहे. मंगळवारी सायंकाळी एकाचवेळी सात हजाराहून अधिक लोकांचा जमाव तेथे आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या ठिकाणी बुधवारी भेट दिली होती़ दररोज सीमेवर हजारोंच्या संख्येने लोक येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी सीमेवर भेट दिली. येथे येणार्यांसाठी पाण्याची व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. झारखंड, मध्यप्रदेश, बिहार व ओडीसा राज्यातील मजुर व कामगारांची संख्या जास्त असुन त्या प्रमाणात बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे़ सोशल डिस्टन्सिंगचा निकष अमलात आणून शासन धोरणानुसार एका बसमधुन २२ प्रवाशी नेले जात असल्याने महेंद्र पंडीत यांनी समाधान व्यक्त केले.तापी जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेशी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी चर्चा केली. दरम्यान दररोज वाढणारी प्रवासी संख्या पाहता नवापुर सीमा व नवापुर शहरात पहावे तिकडे लालपरी उभ्या दिसत आहेत. तपासणी नाक्यावर सुमारे २०० बसेस उभ्या असून शहरातील ही संख्या शंभराच्या घरात आहे.औरंगाबाद विभागातील ७५, जळगांव विभागातुन ५० व धुळे विभागातुन १०० बसेस अशा २२५ जादा बसेस नवापुरात दाखल झालेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील १०० बसेस १० मे पासूनच सेवेत दाखल झालेल्या आहेत़
नवापुर सीमा तपासणी नाक्यावरुन निघणाºया बसेस राज्याच्या विविध भागात जाऊन परत येत आहेत़ या उपक्रमामुळे २५ हजार पेक्षा अधिक परप्रांतीय त्यांच्या गावांच्या मार्गाला लागले असल्याची माहिती आहे़


गोंदिया सारख्या ८०० ते ९०० किलोमीटर अंतरावरील बसफेरी पुर्ण करण्यासाठी तीन ते सहा दिवस जात आहेत. लॉकडाउनमुळे महामार्गावर जेवणाची सोय नाही. चालक व वाहकांची संख्या वाढल्याने लांब फेरी पूर्ण करुन आलेल्या प्रत्येक चालक व वाहकास आरामाची सोय उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी आराम करुन घेणे व मिळेल त अन्न पदार्थ पदार्थ खाउन पोटाची भूख शमविणे यातच ते स्वत:चे समाधान करुन घेत आहेत. सुदैवाने नवापुर शहरात सामाजिक व धार्मिक संघटनांचे जागृत कार्यकर्ते अन्नदानाचे कार्य लॉकडाउन सुरु झाल्यापासुन अविरतपणे पार पाडत असल्याने गुजरात राज्यातून येणारे प्रवासी व चालक वाहकांची बऱ्याच अंशी सोय होत आहे़


 

Web Title: Superintendent of Police inspects the border check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.