ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 01:25 PM2020-08-04T13:25:56+5:302020-08-04T13:26:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली ...

The sum insured was deducted from the loan even though it was optional | ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती़ यातून यंदा कर्ज घेताना पिक विमा ऐच्छिक करण्यात आला होता़ परंतू यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम कापली गेली असून हे कसे, झाले हा विचार करुन आता शेतकरी हैराण झाले आहेत़
जिल्ह्यात दरवर्षी खरीप पिकांची लागवड करणाºया शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी पिक कर्ज घेतात़ जिल्हा बँकेमार्फत सोसायटी, प्रत्यक्ष बँक शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून हे कर्ज घेण्यात येते़ यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व बँकांनी १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अद्याप बँकांचे कामकाज रेंगाळल्याचे चित्र आहे़ महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतून १३ हजार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे़ परंतू यातील बहुतांश शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत़ एकीकडे हे शेतकरी कर्जापासून वंचित असताना दुसरीकडे कर्ज देणाºया बँकांनी शेतकºयांच्या कर्जातून विम्याची रक्कम कापून घेत कर्ज दिल्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारात शेतकºयांची चूक दर्शवत बँकांनी हात वर केले आहेत़ शेतकºयांनी कर्ज घेताना बँकांकडे भरलेल्या अर्जात विमा घ्यावी किंवा नाही, अशा खूणा करावयाच्या होत्या़ यातून बºयाच बँकांचे कर्जाचे अर्ज हे अत्यंत किचकट आणि इंग्रजाळलेले असल्याने शेतकºयांनी हा कॉलम सोडून दिला होता़ मात्र चाणाक्ष बँकांनी होकार असो किंवा नसो शेतकºयांचा विमा कापून कर्जाची रक्कम दिली आहे़ असे असले तरी ३१ जुलै रोजी पूर्ण झालेल्या पिक विम्याच्या मुदतीत जिल्ह्यातील साडेचार हजारापेक्षा अधिक शेतकºयांनी विमा केलेला नसल्याची माहिती आहे़ यातून कर्ज वाटपात बँका उघड्या पडत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा बँकेने शेतकºयांना वाटप केलेले कर्ज हे १० ते ३० हजाराच्या घरात आहे़ यातही बºयाच शेतकºयांचा विमा कापला गेला असल्याने त्यांना तुरळक रक्कम भेटली आहे़

शासनाकडून यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती़ हा विमा ऐच्छिक करण्यात आल्याचे आधीच घोषित होते़ परंतू शेतकऱ्यांनी अर्जावर हवे किंवा नाही अशी खूण न केल्यास सरसकट विमा रक्कम कापून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते़ यात आदेशांचे बँकांनी तंतोतंत पालन केले आहे़
जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी यंदा विमा केल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातही हे शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद असल्याचे सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत विम्यात सहभागी होण्यासाठी सीएससी सेंटरवर जावून अर्ज करणे बंधनकारक होते़ सीएससी सेंटर्सची जिल्ह्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ ही आकडेवारी १५ आॅगस्टसमोर येणार आहे़ यात दीड हजार शेतकºयांचा समावेश होवून पिक विम्याची आकडेवारी ही सहा हजारापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत़
बºयाच शेतकºयांच्या खात्यातून ३१ जुलै नंतर रक्कम कापली गेल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर या प्रकाराचा ग्रामीण भागात उलगडा झाला आहे़ सोमवारी बºयाच शेतकºयांनी बँकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ शासनाच्या निर्र्देशानुसार ही रक्कम कापली गेली असल्याचे बँकांच्या प्रशासनाकडून शेतकºयांना सांगण्यात आले आहे़

Web Title: The sum insured was deducted from the loan even though it was optional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.