जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:01 PM2020-02-23T12:01:09+5:302020-02-23T12:01:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ...

Sugar season in the district is nearing completion! | जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

जिल्ह्यातील साखर हंगाम आता समारोपाकडे..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा ऊसाची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्याकडून गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारणत: दोन ते अडीच लाख क्विंटल कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखाना बंद झाला आहे. तर आयान शुगर आणि आदिवासी साखर कारखाना महिना अखेर बंद होण्याची शक्यता आहे.
खान्देशात यंदा पाच कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतला आहे. त्यापैकी तीन कारखाने एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना, नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना व खाजगी तत्वावरील नंदुरबार तालुक्यातील आयान शुगर या कारखान्यांचा त्यात समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात या तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामास सुरुवात केली होती.
यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे सर्वच कारखान्यांनी कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्न केला होता. असे असले तरी लगतच्या गुजरात व मध्यप्रदेशातील खांडसरी आणि साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस पळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे तिन्ही साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सद्य स्थितीत सातपुडा साखर कारखान्याने त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी नोंद केलेला सर्व ऊस गाळप केला आहे. आणखी ऊस मिळण्याची आशा मावळल्याने कारखान्याने आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात साधारणत: दहा लाखापेक्षा अधीक साखर उत्पादन झाले होते. यंदा जवळपास ७ लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक साखर उत्पादन शक्य आहे.
आयान शुगर कारखाना देखील पुर्ण १०० दिवस चालण्याची शक्यता आहे. कारखान्याकडे अजूनही ऊसाचा पुरवठा सुरू आहे. आदिवासी साखर कारखान्याचे जवळपास ९० दिवस सुरू ठेवण्याचे नियोजन केल्याचे समजते. कारखान्याकडे अजूनही ऊस पुरवठा सुरू आहे.
पुढील वर्षी चांगला हंगाम
यंदा साधारणत: सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी, कुपनलिका यांच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे. अनेक जलप्रकल्प अद्यापही ६० ते ७० टक्केपेक्षा अधीक भरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुढील वर्षी तिन्ही साखर कारखान्यांना मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी ऊस लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देणे देखील सुरू ठेवले आहे.


यंदाच्या साखर हंगामात सर्वाधिक साखर उत्पादन खाजगी तत्वावरील आयान शुगर कारखाना घेणार आहे. १७ तारखेच्या अहवालानुसार कारखान्याने ३,२३,५३० मे.टन ऊस गाळप केले आहे. त्यातून ३,२९,८५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा १०.२८ टक्के मिळाला आहे.
नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखान्याने ९९,९३३ मे.टन ऊस गाळप करून ९५,३०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला आहे. कारखाना आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.
सातपुडा साखर कारखान्याने १०.२५ सरासरी साखर उताऱ्याच्या तुलनेत २ लाख ८१ हजारापेक्षा अधीक ऊस गाळप करून २ लाख ८६ हजारापेक्षा अधीक साखर उत्पादन घेतले आहे. कारखाना सरासरी ८८ दिवस सुरू राहिला.

Web Title: Sugar season in the district is nearing completion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.