शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

पिताकडून पूत्राकडे यशस्वी सत्तांतर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 11:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : मतदार संघात झालेली विकासकामे व निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात हवे असलेले नियोजन व्यवस्थित पार पाडल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : मतदार संघात झालेली विकासकामे व निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात हवे असलेले नियोजन व्यवस्थित पार पाडल्याने कॉग्रेसला नवापूर मधे अपेक्षित यश मिळविता आले. अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार शरद गावीत दुस:या क्रमांकाची मते घेण्यात यशस्वी ठरले तर भाजपाला तिस:या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नवापूर मतदार संघात दोन लाख 17 हजार 18 इतके म्हणजे 75.37 टक्के मतदान झाल्यानंतर राजकिय क्षेत्रात व सर्वसामान्य जनतेत निकालाविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावून यश अपयशाचे अंदाज बांधले जात होते. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जाहीर झालेल्या निकालानंतर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. कॉग्रेस उमेदवार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक यांनी पहिल्या फेरीपासुन घेतलेली आघाडी शेवटच्या 24 व्या फेरीपयर्ंत टिकवुन ठेवली. अपक्ष उमेदवार शरद कृष्णराव गावीत व भाजपा उमेदवार भरत माणिकराव गावीत यांना एकाही फेरीत कॉग्रेस उमेदवारापेक्षा जास्त मते मिळु शकली नाहीत. शिरीषकुमार  नाईक यांचे प्राबल्य असलेल्या धायटे भागात चौथ्या फेरी अखेर साडेसहा हजाराचे मताधिक्य होते. या ठिकाणी शरद गावीत दुस:या स्थानी राहिले तर भाजप तिस:या स्थानी. शरद कृष्णराव गावीत यांचे प्राबल्य असलेल्या नंदुरबार तालुक्यातील दोन महसूल मंडळांमध्ये कॉग्रेसपेक्षा सहा हजाराची अधिकची मते मिळालीत. येथे कॉग्रेसने क्रमांक दोनची मते घेतली. भाजप उमेदवार भरत गावीत यांना त्यांचे प्राबल्य असलेल्या तालुक्यातील पश्चिम भागातून क्रमांक एकची मते मिळालीत मात्र त्या आधी झालेल्या मतांच्या पिछाडीला त्यांची ही मते उपयोगात येउ शकली नाहीत. नवापूर शहरात भाजपाचे प्रदर्शन चांगले राहिले. शहरात भाजपाने सहा हजार 512 मते मिळवलीत.     कॉग्रेसला क्रमांक दोनची पाच हजार 363 मते मिळालीत तर अपक्ष   उमेदवार शरद गावीत यांना 981 मते शहरातून मिळालीत. भाजपाने शहरात एक हजार 149 अधिकची मते घेतलीत.  कॉग्रेसचे संघटन तालुक्यात सर्वदुर मजबुत आहे. ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांनी प्रत्यक्ष प्रचारात भाग घेतला नाही. सर्व धुरा उमेदवार शिरीष नाईक यांनी एकहाती सांभाळली. जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावीत, अजीत नाईक, दिपक नाईक, रमेश ठाकुर गावीत, डॉ. नचिकेत नाईक, आघाडी धर्म निभवणारे पालिकेतील विरोधी पक्ष नेता नरेंद्र नगराळे, नगराध्यक्षा हेमलता पाटील व कॉग्रेसचे नगरसेवक यांनी प्रचार व इतर कार्याची धुरा सांभाळुन पक्षाच्या विजयासाठी आपले योगदान दिले. कॉग्रेसकडुन एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही व नामांकन दाखल करतेवेळी केलेल्या शक्तीप्रदर्शन व्यतिरिक्त प्रचार फेरी देखील काढण्यात आली नाही. भाजप कडुन राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. कार्यकत्र्यांचे ग्रामीण भागात प्रचार फेरी, उमेदवार म्हणुन भरत गावीत यांनी ग्रामीण भागात केलेला झुंझार प्रचार व घेतलेल्या सभा त्यांना अपेक्षापुर्ती पावेतो नेवू शकल्या नाही. उघड प्रचार न करता हळुवार प्रचार करुन शरद गावीत यांनी प्रचार दरम्यान शहरात काढलेली प्रचार रॅली सर्वांना चकीत करणारी ठरली होती. मात्र त्यांनाही यशापासून दुर रहावे लागले. शेवटी मतदार संघात   आमदार सुरुपसिंग नाईक यांनी केलेली विकास कामे, त्यांची व परिवाराची काम करण्याची पध्दत, त्यांचे संस्कार या गोष्टी मतदारांच्या पसंतीस खरे उतरलीत व यातुनच नाईक परिवारातील एका पिढीतुन दुस:या पिढीत सत्तांतर घडविण्यात शिरीष नाईक यशस्वी ठरले. शिवाय काँग्रेसचा पारंपारिक गड देखील कायम राखण्यात त्यांना यश    मिळाले.