शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:49 PM2019-10-12T12:49:02+5:302019-10-12T12:49:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील शालेय, पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्याना मिळणा:या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक समस्यांना ...

Student surprised when filling out a scholarship application | शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थी हैराण

शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थी हैराण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील शालेय, पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्याना मिळणा:या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. शहरी व ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुरळीत नसल्याने ऑनलाईन अर्ज करताना अडचणी निर्माण होत आहेत.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्याथ्र्याना सुलभ व पारदर्शकपणे मिळावा  व शिष्यवृत्तीमधील दोष टाळून या प्रकियेत कसलाही गैरप्रकार किंवा दिरंगाई होऊ नये यासाठी शासनातर्फे शिष्यवृत्ती योजना ही ऑनलाईन करण्यात आली.          2017-18 या शैक्षणिक सत्रापासून सुरू झालेल्या या पद्धतीबद्दल विद्याथ्र्यासह महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. मात्र शहरी भागासह ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीत अडचणी येत आहे. तसेच मुदत संपत असल्याने विद्यार्थी हा अनभिज्ञ व उदासीन दिसून येत आहे. याअगोदर शिष्यवृत्ती अर्ज कागदपत्राच्या आधारे समाजकल्याण विभागामार्फत संबंधित शाळा-महाविद्यालय यांच्याकडून संबंधित विद्याथ्र्याना  धनादेशाद्वारे देण्यात येत होती. यात अनेकवेळा अनियमितता होत असल्याचा ठपका ठेवत शासनाने संपूर्ण प्रकिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र संपण्याच्या मार्गावर असताना बहुतांश विद्याथ्र्यानी तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले नाही. या योजनेसाठी विद्याथ्र्याना आधारकार्डसह विविध कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतात. मात्र अशी सुविधा करताना इंटरनेट कनेक्टीव्हीटी बंद होण्यासह इतर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्याथ्र्यानी गैरसोय होऊन पालक व विद्याथ्र्याची दमछाक होत आहे. संबंधित विभागाने ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करताना येणा:या तांत्रिक अडचणीत सुधारणा करून मुदत वाढविण्याची मागणी होत आहे.
ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरताना  शासन प्रत्येकवेळी नवीन नियम काढत असल्याने विद्यार्थी संभ्रमात असतात. अनेकवेळा संबंधित विभागाची वेबसाईट नियमित बंद असते. त्यामुळे विद्याथ्र्याचा खूप वेळ  वाया जातो. शिष्यवृत्ती हा विद्याथ्र्याचा हक्क असूनही त्यापासून तो नियमित वंचित ठेवण्यात शासन यशस्वी झाले. अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेच्या माध्यमातून विद्याथ्र्याचे मुबलक पैसे खर्च होतात. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने एकाच पद्धतीचा वापर करावा. -प्रीतम निकम, कार्यकारिणी सदस्य, अ.भा. विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश

Web Title: Student surprised when filling out a scholarship application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.