शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

गावात बस मुक्कामी थांबावी यासाठी बलदाणे ग्रामस्थांचे बस रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार आगारातून सुटणारी बलवंड मुक्कामी बस पुन्हा पुढील बळसाणे मुक्कामाला हलविण्याचा आगार प्रमुखांच्या निर्णयाविरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : नंदुरबार आगारातून सुटणारी बलवंड मुक्कामी बस पुन्हा पुढील बळसाणे मुक्कामाला हलविण्याचा आगार प्रमुखांच्या निर्णयाविरोधात बलवंड ग्रामस्थांतर्फे पुन्हा बस रोको आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.नंदुरबार आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता बलवंड मुक्कामासाठी १० वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांकरीता ही बस सुरू आहे. शनिमांडळ आणि नंदुरबार येथे शिक्षणाकरीता जाणाºया विद्यार्थ्यांसाठी ही बस सोयीची असल्याने ती बलवंड येथून पूर्णपणे भरते. परंतु गेल्या महिन्यापासून ही बस बलवंडपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बळसाणे येथे मुक्कामी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, शैक्षणिक नुकसानदेखील होत आहे.याबाबत आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ व पालकांनी बलवंडला बस रोको आंदोलन करून बसचा पुढील मुक्काम बंद पाडला. यानंतर पुन्हा गुरूवारी आगार प्रमुखांनी ही बस बळसाणे येथे मुक्कामी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांना समजताच त्यांनी पालकांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता पालकांनी बलवंड येथील आगारात बस आल्यावर रोखून ठेवल्याने बसचालक युवराज भिल यांनी आगार प्रमुखांना या घटनेची माहिती दिली.दरम्यान आगार प्रमुखांनी पालक रमेश ठाकूर यांच्याशी अरेरावी करीत बस सोडली नाही तर पोलीस पाठवू असे सांगितल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. या वेळी आगार प्रमुख स्वत: येत नाही तोवर बस मार्गस्थ करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यानंतर राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ही बस बलवंड येथेच मुक्कामी राहील, अशी ग्वाही मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.