शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

चिमणीपाड्यात चालल्या लाठ्या-काठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे दोन गटात मारहाण झाली. त्यात दोन जण जखमी झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे दोन गटात मारहाण झाली. त्यात दोन जण जखमी झाले. याबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पोलीस सूत्रांनुसार, चिमणीपाडा येथील जामुबाई भिमसिंग गावीत ही महिला अंगण झाडत असतांना त्याची धूळ उडून ती सुुरेश पोसल्या गावीत यांच्या अंगणात पडली. त्यामुळे गावीत व वसावे परिवारात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. मारहाणीत लोखंडी पाईप, कुऱ्हाड, लाकडी काठ्या यांचा वापर करण्यात आला. याबाबत जामूबाई भिमसिंग गावीत यांनी फिर्याद दिल्याने सुरेश पोसल्या वसावे, रमेश पोसल्या वसावे, अविनाश रमेश वसावे, लक्ष्मी रमेश वसावे, तेजल सुरेश वसावे, शितल रमेश वसावे, रमिला सुरेश वसावे सर्व रा.चिमणीपाडा, ता.नवापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत स्वत: फिर्यादी जामूबाई गावीत या जखमी झाल्या आहेत. तपास हवालदार विश्वास गावीत करीत आहे. दुसरी फिर्याद रमेश पोसल्या गावीत यांनी दिली. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून जमावाने दरवाजा तोडून घरात घुसून कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यात स्वत: रमेश गावीत हे जखमी झाले. त्यांच्या फिर्यादीवरून भिमसिंग बाब्या गावीत, रवी भिमसिंग गावीत, हुपसिंग, गणेश भिमसिंग गावीत सर्व रा.चिमणीपाडा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक बी.व्ही.बैसाणे करीत आहे.