चिमणीपाड्यात चालल्या लाठ्या-काठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:38 PM2020-10-30T12:38:50+5:302020-10-30T12:38:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे दोन गटात मारहाण झाली. त्यात दोन जण जखमी झाले. ...

Sticks in Chimanipada | चिमणीपाड्यात चालल्या लाठ्या-काठ्या

चिमणीपाड्यात चालल्या लाठ्या-काठ्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : किरकोळ कारणातून चिमणीपाडा, ता.नवापूर येथे दोन गटात मारहाण झाली. त्यात दोन जण जखमी झाले. याबाबत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  
पोलीस सूत्रांनुसार, चिमणीपाडा येथील जामुबाई भिमसिंग गावीत ही महिला अंगण झाडत असतांना त्याची धूळ उडून ती सुुरेश पोसल्या गावीत यांच्या अंगणात पडली. त्यामुळे गावीत व वसावे परिवारात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. मारहाणीत लोखंडी पाईप, कुऱ्हाड, लाकडी काठ्या यांचा वापर करण्यात आला. 
याबाबत जामूबाई भिमसिंग गावीत यांनी फिर्याद दिल्याने सुरेश पोसल्या वसावे, रमेश पोसल्या वसावे, अविनाश रमेश वसावे, लक्ष्मी रमेश वसावे, तेजल सुरेश वसावे, शितल रमेश वसावे, रमिला सुरेश वसावे सर्व रा.चिमणीपाडा, ता.नवापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत स्वत: फिर्यादी जामूबाई गावीत या जखमी झाल्या आहेत. तपास हवालदार विश्वास गावीत करीत आहे. 
दुसरी फिर्याद रमेश पोसल्या गावीत यांनी दिली. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून जमावाने दरवाजा तोडून घरात घुसून कुऱ्हाडीने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यात स्वत: रमेश गावीत हे जखमी झाले. 
त्यांच्या फिर्यादीवरून भिमसिंग बाब्या गावीत, रवी भिमसिंग गावीत, हुपसिंग, गणेश भिमसिंग गावीत सर्व रा.चिमणीपाडा यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक बी.व्ही.बैसाणे करीत आहे. 

Web Title: Sticks in Chimanipada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.