विसरवाडी ते देवमोगरा पदयात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:41 PM2020-02-22T12:41:50+5:302020-02-22T12:41:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : देव मोगरामाता पदयात्रा मंडळातर्फे विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला असून भाविकांनी पालखीचे ...

Starting from Vissarwadi to Devamogra | विसरवाडी ते देवमोगरा पदयात्रेस प्रारंभ

विसरवाडी ते देवमोगरा पदयात्रेस प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : देव मोगरामाता पदयात्रा मंडळातर्फे विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला असून भाविकांनी पालखीचे पूजन केले जात आहे. या पदयात्रेत महिलांसह एकुण २०५ भाविकांचा समावेश आहे.
मातेच्या दर्शनासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. यात्रषपूर्वी श्री शनेश्वर मंदिराजवळ सरपंच बकाराम गावीत व सखाराम गावीत यांच्या हस्ते देवमोगरा माता पालखीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी पुजारी मनीष महाराज, सुरेश गावीत, विजय अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, अशोक गावीत, बबलू गावीत, रेवल्या गावीत, दिनकर गावीत यांच्यसह शेकडो भाविक उपस्थित होते.
गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य, देव मोगरा माता की जय अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावात ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन केले. सर्वत्र मातेचा जयघोष व मंगलमय वातावरण होते. ही पदयात्रा विसरवाडीहून श्रावणी, खांडबारा, खैरवे, धानोरा, शेगवा, बेज, वण्याविहिर, अक्कलकुवा, खापर, सेलंबामार्गे देवमोगरा येथे पोहोचणार आहे. तेथे मातेला चुनरी तसेच सोबत घेऊन गेले शिदोरी अर्पण करणार आहे. यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व देव मोगरा माता पदयात्रा मंडळातर्फे करण्यात आली.

Web Title: Starting from Vissarwadi to Devamogra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.